अबु धाबी येथे रविवारी (१ नोव्हेंबर) आयपीएलच्या १३ व्या हंगामातील ५३ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला. या सामन्यात वयाची चाळीशी ओलांडणाऱ्या चेन्नईचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर आणि पंजाबचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल यांनी एक कारनामा केला आहे. हा कारनामा यापूर्वी आयपीएल इतिहासात कधीच झाला नव्हता.
झाले असे की, नाणेफेक जिंकून चेन्नई संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि पंजाब संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी पंजाबकडून डावाची सुरुवात केएल राहुल आणि मयंक अगरवालने केली. दोघेही चांगली फटकेबाजी करत संघाची धावसंख्येत भर घालत होते. परंतु सहाव्या षटकातच पंजाबने मयंक अगरवालच्या रूपात आपली पहिली विकेट ४८ धावांवर गमावली.
यानंतर ख्रिस गेल फलंदाजीला आला. परंतु त्याला यावेळी चांगली कामगिरी करता आली नाही. १२ धावांवर खेळत असताना चेन्नईचा अनुभवी गोलंदाज इम्रान ताहीरने त्याला डावाच्या १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पायचीत केले.
त्यामुळे आयपीएल इतिहासात असे पहिल्यांदाच घडले, जेव्हा ४० पेक्षा अधिक वय असलेल्या गोलंदाजाने ४० पेक्षा अधिक वय असलेल्या फलंदाजाला पायचीत केले.
खरं तर इम्रान ताहीरचे वय ४१ वर्षे आणि २१९ आहे, तर ख्रिस गेलचे वय ४१ वर्षे आणि ४१ दिवस आहे.
इम्रान ताहीरने या सामन्यात गोलंदाजी करताना ४ षटकात २४ धावा देत १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
-“तीन पराभवानंतर सलग 3 सामने जिंकूही शकतो”, बेंगलोरच्या दिग्गजाला आहे विश्वास
-भारतीय कर्णधार असलेल्या संघांनी करावा प्लेऑफमध्ये प्रवेश, पाहा कोण म्हणतंय असं
-ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांच्या एका चुकिमुळे क्रिकेट बोर्ड नाराज
ट्रेंडिंग लेख-
-एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
-IPL 2020: प्रतिभाशाली असूनही पंजाब संघाकडून एकाही सामन्यात संधी न मिळालेले ५ युवा क्रिकेटर्स
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण