---Advertisement---

IND vs SA: वरुण चक्रवर्ती ठरला ही कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज; आफ्रिकेविरुद्ध एक विकेट घेताच रचला इतिहास!

On: सोमवार, फेब्रुवारी 23, 2026 7:52 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचे डोळे उघडले आहेत. 2024 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेत आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी मोठा पराभव केला. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली, तर त्याआधी मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनीही निराशा केली. मात्र, या खराब कामगिरीतही भारताचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने (Varun Chakrawarthy) इतिहास रचला आहे. त्याने एक विकेट घेताच अर्शदीप सिंगचा (Arshdeep singh) मोठा विक्रम मोडीत काढला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) सामन्यात वरुण थोडा महागडा ठरला, त्याने 4 षटकांत 47 धावा दिल्या. पण आपल्या शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरची (David Miller) विकेट घेताच त्याच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली.

वरुण आता भारतासाठी सलग 18 टी-20 सामन्यांत किमान एक तरी विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम अर्शदीप सिंगच्या नावावर होता, ज्याने 2024-25 मध्ये सलग 17 सामन्यांत विकेट्स घेतल्या होत्या.

वरुणने या विश्वचषकात आतापर्यंत 5 सामन्यांत 10 विकेट्स घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो महागडा ठरला असला तरी, नामीबियाविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 7 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच वरुणने आतापर्यंत भारतासाठी 41 सामन्यांत 69 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---