भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) याने ‘सिक्सर किंग’ म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले असले तरी देखील चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, युवराज सिंगने रविवारी (१२ डिसेंबर) आपला ४० वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने देखील एक खास व्हिडिओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
विराट कोहली आणि युवराज सिंग हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघेही मैदानावर आक्रमक भूमिकेत दिसून येत असले तरी देखील मैदानाबाहेर हे खेळाडू नेहमीच मस्ती करताना दिसून येत असतात. अशातच विराट कोहलीने युवराज सिंगचा वाढदिवस आणखी खास करण्यासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्याने युवराज सिंग आणि त्याची पहिली भेट झाल्याचा अनुभव सांगितला आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कोहली म्हणाला की, “जेव्हा मी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतून आलो होतो. त्यावेळी त्याने माझे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले. त्याने माझ्यासोबत मस्करी करायला सुरुवात केली. आम्हाला एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ आवडतात. आम्ही पंजाबी आहोत, त्यामुळे आम्हाला पंजाबी गाणे ऐकायला खूप आवडतात.” या व्हिडिओवर क्रिकेट चाहते देखील मजेशीर प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
याशिवाय विराटने एक जुनी आठवण सांगितली. तो म्हणाला की, श्रीलंकेत एकदा युवराज पहाटे ३.३० वाजता आला आणि म्हणाला दांबुलापासून ते कोलंबोपर्यंत सायकलवर जाऊ. हे ऐकून सर्वजण खूप हसले होते. कारण, दोन दिवसांनी सामना खेळायचा होता.
Birthday wish to @YUVSTRONG12 from @imVkohli 🍰❤ pic.twitter.com/aVccJ2NbMM
— 𝐁𝐚𝐫𝐬𝐡𝐚ⱽⁱʳᵃᵗ ᴷᵒʰˡⁱ 👑ᴿᶜᴮ (@barshaVkohli18) December 12, 2021
युवराज सिंगने १७ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १० जून २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण ३०४ वनडे सामने खेळले, ज्यामध्ये त्याला ८७०१ धावा करण्यात यश आले होते. तर ५८ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने ११७७ धावा केल्या. तसेच ४० कसोटी सामन्यात त्याला १९०० धावा करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या :
फॉर्म्यूला वनच्या इतिहासातील सर्वात रोमांचक शर्यतीवर रिऍक्ट झाले सचिन, रोहित; पाहा काय म्हणाले?
द. आफ्रिका दौरा: ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर इन, तर १७ शतके झळकावणारा फलंदाज होऊ शकतो संघाबाहेर