---Advertisement---

हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…

On: मंगळवार, एप्रिल 28, 2020 10:24 AM
---Advertisement---

सध्या कोरोना व्हायरसमुळे भारत देशात चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत.

अशात ईएसपीएन क्रिकइंफोने भारताचे माजी कसोटी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांना, हर्षा भोगले यांचे नाव ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिल्यांदा येणारी गोष्ट कोणती? असे विचारले होते. यावर मांजरेकरांनी उत्तर दिले की, “भारताचा सर्वोत्कृष्ठ समालोचक.”

बीसीसीआयने मार्चमध्ये मांजरेकरांना (Sanjay Manjrekar) समालोचकांच्या पॅनेलमधून काढून टाकले. ते धरमशाला येथील भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील वनडे सामन्यावेळी अनुपस्थित असल्याने बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला होता. तसेच त्याला इतरही अनेक कारणं असल्याचं तेव्हा बोललं जातं होतं.

समालोचकांच्या पॅनेलमधून काढून टाकण्यात आल्यानंतर स्पष्टवक्ते असणाऱ्या माजरेकरांनी त्यांचे विचार शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले होते की, “समालोचनाला मी माझा विशेषाधिकार मानतो, पण हक्क नाही.”

“हे माझ्या निवडकर्त्यांवर निर्भर करते की त्यांनी मला घ्यावे की नाही. त्यांच्या कोणत्याही निर्णयाचा मी आदर करेल. कदाचित बीसीसीआय (BCCI) माझ्याकडून उशिरा झालेल्या कामगिरीवर नाखूश असेल. पण मी व्यावसायिक दृष्टीने त्याचा स्विकार करतो,” असेही मांजरेकर पुढे म्हणाले.

माजरेकरांनी २०१९मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळण्यात आलेल्या ऐतिहासिक गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात भोगलेंनी क्रिकेट न खेळल्यामुळे त्यांना क्रिकेटची समजूत नसल्याची टीका केली होती. तर त्यांनी २०१९च्या आयसीसी विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाबद्दल (Ravindra Jadeja) विवादात्मक वक्तव्य केले होते. त्यावेळी मांजरेकरांना टीकेला सामोरे जावे लागले होते.

अखेर, २०२०च्या सुरुवातीला मांजरेकरांनी मान्य केले होते की, २०१९ हे वर्ष समालोचक म्हणून त्यांना खूप वाईट गेले होते.

याविषयी ईएसपीएन क्रिकइंफोशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, “२०१९ हे वर्ष क्रिकेट विश्लेषक आणि समालोचक म्हणून मला खूप वाईट गेले. मी माझ्या व्यावसायिक वागण्यावर खूप गर्व करतो. पण मी ती कमेंट करत, माझ्यातील अव्यासायिकता दाखवून दिली. मी चुकलो आणि मला त्याचे दुख:ही आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं

-टीम इंडियाचे ५ शिलेदार व त्यांच्या आवडत्या बाॅलीवूड अभिनेत्री

-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---