क्रिकेटपटू कोणत्याही चित्रपटातील अभिनेत्यापेक्षा कमी नाहीत. संपूर्ण जगभरात त्यांचे चाहते असतात. ज्या वेळी क्रिकेटपटूंबद्दल विषय निघतो, तेव्हा त्यांची सर्वत्र चर्चा होते. तसं पाहिलं तर भारतीय संघाच्या खेळाडूंचे चाहते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आहेत. परंतु ज्यांचे लाखो करोडो चाहते आहेत. तेच कोणाचेतरी चाहते आहेत.
आपण या लेखात त्या ५ भारतीय क्रिकेटपटूंची माहिती घेणार आहोत, ज्यांना बॉलिवूड अभिनेत्री आवडतात.
५ भारतीय क्रिकेटपटूंना आवडणाऱ्या अभिनेत्री-
युवराज सिंग-
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh) नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले आहे. परंतु बॉलिवूडची सिमरन म्हणजेच काजोल ही अभिनेत्री युवराजची क्रश आहे. आजही युवराजला काजोल खूप आवडते.
याव्यतिरिक्त युवराजची पत्नी हेजल कीच (Hazel Keech) हीदेखील बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेजलने बॉडीगार्ड या हिंदी चित्रपटात करीना कपूर खानच्या मैत्रिणीची भूमिका निभावली होती.
रोहित शर्मा-
भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) आपल्या दमदार खेळीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या फलंदाजीने अवघ्या क्रिकेटजगताला भूरळ घातली आहे. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. असे असले तरी रोहतलाही बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) खूप आवडते.
याचा खुलासा त्याने एका मुलाखतीदरम्यान केला होता. यादरम्यान तो म्हणाला होता की, करिना माझी क्रश आहे. रोहितने करिनाबद्दल बोलताना सांगितले की, “करीना खूप सुंदर आहे. मी करिनाचे सर्व सिनेमे पाहतो. मी तिचा दिवाना आहे.”
सौरव गांगुली-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा आपल्या कामाने सर्वांची मने जिंकत आहे. मग ते मैदानावर खेळताना असो किंवा मग बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून निर्णय घेताना असो.
गांगुलीचे नाव तसं पाहिलं तर बॉलिवूड अभिनेत्री नगमाबरोबर जोडले गेले होते. परंतु त्याची क्रश ही बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) होती.
विराट कोहली-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर (Anushka Sharma) लग्न केले आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना असे वाटते की अनुष्काच विराटची क्रश आहे. परंतु तसं काही नाही. विराटचे प्रेम आणि जीवनसाथी अनुष्का शर्मा आहे. परंतु त्याची क्रश ही बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आहे. ऐश्वर्याच्या सुंदरतेची चर्चा संपूर्ण जगभरात होते.
केएल राहुल-
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचा चाहता बनत आहे. सध्या त्याचे नाव बॉलिवूड अभिनेता आण्णा म्हणजेच सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी अथिया शेट्टीबरोबर (Athiya Shetty) चर्चेत आहे. परंतु असे असले तरीही २०१७मध्ये एका मुलाखतीदरम्यान राहुलने सांगितले होते की, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आपली क्रश आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
-४३ वर्षांपुर्वी २० युरोंसाठी तो मैदानात गेला थेट नग्न अवस्थेत