2023 वर्ष क्रिकेटसाठी खास ठरणार आहे. या वर्षात पुरुष संघांचा वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले नाही, मात्र ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळली जाणार आहे. चौथ्यांदा भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे, मात्र संपूर्ण वनडे विश्वचषक भारतात खेळला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ.
भारतात पहिल्यांदा 1987 चा वनडे विश्वचषक खेळला गेला. ज्यामधील काही सामने पाकिस्तानमध्येही खेळले गेले होते. म्हणून त्या स्पर्धेचे भारत-पाकिस्तान हे दोघेही आयोजक होते. 1996 मध्येही भारतात ही स्पर्धा झाली होती. त्यामध्ये भारताबरोबर श्रीलंका आणि पाकिस्तान यांनीही यजमानपद भुषविले होते. त्यानंतर 2011मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्याकडे होते. त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरण्याची कामगिरी केली होती.
यंदाच्या स्पर्धेत 10 संघ भाग घेणार आहेत. मागील विश्वचषकाप्रमाणे यंदा गट पाडले जाणार नाहीत. यामुळे सर्व संघांना एकूण 9 साखळी सामने खेळावे लागणार आहे. यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत जाणार आहेत. या स्पर्धेसाठी भारताबरोबर अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे 7 संघ पात्र ठरले आहेत. यामध्ये पात्र ठरण्यासाठी आयसीसीने वर्ल्ड कप सुपर लीगचे सामने खेळवले. त्यामध्ये 13 संघ खेळत आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान समोरा-समोर येणार आहेत.
शेवटचा वनडे विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 ला खेळण्यात आला. त्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते.
वनडे विश्वचषकाच्या हंगामाबाबत पाहिले तर यंदा हा 13वा हंगाम असणार आहे. आतापर्यंत झालेल्या 12 हंगामात 6 संघांनी विजेतेपद पटकावली आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया सर्वाधिक असे 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे. ते 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये वनडे चॅम्पियन ठरले. त्यानंतर भारत-वेस्ट इंडिज यांनी सर्वाधिक वनडे विश्वचषक जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन-दोन वेळा वनडे विश्वचषक जिंकला आहे.
भारताने सर्वप्रथम 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वनडे विश्वचषक जिंकला होता. त्यांनतर 2011मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली दुसरा विश्वचषक जिंकला. पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड यांनी प्रत्येकी एकदा वनडे विश्वचषक जिंकला आहे.
(First time entire ODI World Cup in India INDvPAK 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंतबाबत मोठी अपडेट! उपचारांचा चांगला परिणाम, रोहितही बोलला डॉक्टरांशी
रमीझ राजा काय डोक्यावर पडलेत? पाकिस्तानच्या माजी कर्णधारानेच डागले टीकास्त्र