ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात थरारक सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 5 धावांनी निसटता विजय मिळवला. न्यूझीलंड संघाने 289 धावांचा पाठलाग करताना अखेरचा चेंडूपर्यंत झुंज दिली. ऑस्ट्रेलिया या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला असला तरी, संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्यासाठी हा सामना विसरण्यासारखा राहीला.
Mitchell Starc has gone wicketless in a World Cup match for the first time in history. pic.twitter.com/Nh4pVvJe0K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2023
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला स्टार्क सलग 23 वनडे विश्वचषक सामन्यात बळी घेऊन या सामन्यात सहभागी झालेला. मात्र, सलग तीन विश्वचषकापासून सुरू असलेली त्याची ही यशाची परंपरा यावेळी खंडित झाली. 2015 विश्वचषकापासून तो ऑस्ट्रेलिया संघासाठी प्रत्येक सामना खेळला आहे. या सर्व सामन्यांमध्ये बळी मिळवण्यात त्याला यश आले होते. हा एक विश्वविक्रम होता. मात्र, या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
या सामन्यात त्याने आपल्या दहा षटकांमध्ये तब्बल 89 धावा दिल्या. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही गोलंदाजाकडून झालेली सर्वात महागडी गोलंदाजी आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर देखील तोच दिसून येतो. मागील विश्वचषकात भारताविरुद्ध त्याने एक बळी मिळवताना 74 धावा खर्च केल्या होत्या.
(First Time Ever In ODI World Cup History Mitchell Starc Goes Wicketless And Spell Most Expensive)
महत्वाच्या बातम्या –
रचिनचा रंग कायम! ऑस्ट्रेलियन गोलंदाजी फोडत ठोकले दुसरे वर्ल्डकप शतक
ऑस्ट्रेलियाने मागील तीन सामन्यात बॉल पाठवलाय ढगात, ठोकले तब्बल इतके षटकार