---Advertisement---

अंतिम सामन्यात प्लेइंग ११ जाहीर करताच, सीएसकेची बाबतीत घडली आजवर न घडलेली गोष्ट

On: शुक्रवार, ऑक्टोबर 15, 2021 9:57 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, जेव्हा चेन्नई सुपर किंग्स संघाने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. त्यावेळी अशी काही गोष्ट घडली, जी आजवर घडली नव्हती.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्स संघ हा आयपीएल २०२१ स्पर्धेतील दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने ३ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. तर सर्वाधिक वेळेस आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा विक्रम देखील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नावे होता.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाने ८ वेळेस अंतिम सामना खेळला होता. या सर्व सामन्यांमध्ये सुरेश रैनाचा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभाग होता. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धेत पहिल्यांदाच असे घडले, जिथे एमएस धोनीने अंतिम सामन्यात सुरेश रैनाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले.

सुरेश रैनाने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम फेरीत असताना सुरेश रैनाला संघाबाहेर केले गेले होते. त्याच्या जागी रॉबिन उथप्पाला स्थान देण्यात आले होते. सुरेश रैनाची आयपीएल २०२१ स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर, त्याने १२ सामन्यात अवघ्या १६० धावा केल्या आहेत. त्याची निराशाजनक कामगिरी पाहता, तसेच त्याच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. तर रॉबिन उथप्पाने ४ सामन्यात ८५ धावा केल्या आहेत.

अशी होती चेन्नई सुपर किंग्स संघाची प्लेइंग इलेव्हेन
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, दीपक चाहर, जोश हेजलवुड

महत्त्वाच्या बातम्या – 

फायनलमध्ये १९२ धावा करुनही चेन्नईसाठी कोलकाताची ‘ही’ आकडेवारी ठरु शकते चिंताजनक

ऐकलंत का! गांगुलीचे पीसीबी अध्यक्षांना आयपीएल फायनल पाहण्यासाठी आमंत्रण, पण…

अविश्वसनीय! टी२० कर्णधार म्हणून धोनीचा ३०० वा सामना; पहिल्या सामन्यातील ‘हे’ सहकारीही मैदानावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---