टी20 क्रिकेटमध्ये असे काही संघ आहेत, जे ऑस्ट्रेलियामध्ये एकदाही विजय मिळवण्यात यशस्वी झाले नाहीयेत. मात्र, त्यांनी हार न मानता या अपयशाचे रूपांतर यशामध्ये करू दाखवले. त्यापैकीच एक संघ म्हणजे न्यूझीलंड होय. न्यूझीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर विजय मिळवण्याचा कारनामा करून दाखवला आहे. टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील शनिवारच्या (दि. 22 ऑक्टोबर) सिडनी येथील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला 89 धावांनी पराभूत करत इतिहास रचला.
सामन्याबद्दल थोडक्यात
या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला. हा निर्णय न्यूझीलंड (New Zealand) संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला आणि गोलंदाजांना चोप देत संघाची धावसंख्या 200 धावांपर्यंत पोहोचवली. यावेळी त्यांना 3 विकेट्सवर पाणी सोडावे लागले. हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला त्यांची गाडी रुळावर आणताच आली नाही. त्यांचा डाव 17.1 षटकात 111 धावांवरच संपुष्टात आला. यामुळे न्यूझीलंडच्या पदरात विजय पडला. त्यांनी हा सामना 89 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, हा त्यांचा ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजय होता.
New Zealand win their first men's international game on Australian soil since 2011 🔥#T20WorldCup | #AUSvNZ | 📝 Scorecard: https://t.co/ouB6f5vSvG pic.twitter.com/gcCoihn9UD
— ICC (@ICC) October 22, 2022
न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय
न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाचा चार वेळा दौरा केला. या दौऱ्यांमध्ये न्यूझीलंडला पहिल्या तीन टी20 सामन्यांवर पाणी सोडावे लागले होते. मात्र, टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी न्यूझीलंडला सर्वप्रथम 2007 साली पर्थ येथे 54 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर 2009 साली सिडनी येथे अवघ्या 1 धावेने पराभव पत्करावा लागला होता. पुढे त्यानंतर 9 वर्षांनी 2018 साली न्यूझीलंड पुन्हा सिडनी येथे 7 विकेट्सच्या फरकाने पराभूत झाला होता. यावेळी जर ते पराभूत झाले असते, तर त्यांची सिडनीत पराभवाची हॅट्रिक केली असती. मात्र, सुदैवाने त्यांनी ही हॅट्रिक चुकवली.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियामध्ये पहिला विजय
54 धावांनी पराभव, पर्थ (2007)
1 धावेने पराभव, सिडनी (2009)
7 विकेट्सने पराभव, सिडनी (2018)
89 धावांनी विजय, सिडनी (2022)*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डेविड वॉर्नरची विकेट टीम साऊदीसाठी ठरली ऐतिहासिक! केले ‘हे’ दोन विक्रम नावावर
अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने झेल घेत स्टॉयनिसला धाडलं तंबूत, व्हिडिओ पाहिला का?