30 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने 13 जणांचा संघ जाहीर केला आहे.
या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू किमो पॉलचे पुनरागमन झाले आहे. पॉल पहिल्या कसोटी सामन्याला दुखापतीमुळे मुकला होता.
त्यामुळे त्याच्याऐवजी पहिल्या सामन्यासाठी मिगुएल कमिन्सचा संघात समावेश करण्यात आला होता. पण त्याला विकेट घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडीज संघातील जागाही गमवावी लागली आहे.
हा एकमेव बदल वेस्ट इंडीजच्या संघात करण्यात आला आहे. बाकी पहिल्या कसोटीसाठी निवडलेलाच संघ या कसोटीसाठी कायम करण्यात आलेला आहे. त्यामुळे अष्टपैलू क्रिकेटपटू राहकिम कॉर्नवॉलला या सामन्यातून कसोटीत पदार्पण करण्याची संधी आहे.
या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत भारत 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. ही मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.
या मालिकेतील दुसरा कसोटी सामना जमैकातील सबिना पार्क, किंग्सटन येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असा आहे वेस्ट इंडीजचा संघ –
जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर्ह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डोवरीच, शॅनन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमेयर, शाय होप, किमो पॉल, केमार रोच.
BREAKING: Keemo Paul replaces Miguel Cummins for the 2nd Test v India in Jamaica. #MenInMaroon #ItsOurGame #WIvIND
Full squad below!
⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ https://t.co/9xM6ElWJKm pic.twitter.com/FpXMGuVFfZ— Windies Cricket (@windiescricket) August 27, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष- लसिथ मलिंगाबद्दल माहित नसलेल्या १० खास गोष्टी
–भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतिक्षेत
–त्या अफलातून खेळीमुळे एका रस्त्यालाच दिले बेन स्टोक्सचे नाव