Loading...

भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू पंतप्रधानांच्या भेटीच्या प्रतिक्षेत

स्विझर्लंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा भारतीय बॅडमिंटनसाठी यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधूने सुवर्णपदक तर साईप्रणीतने कांस्यपदक मिळवले. याबरोबर बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या पॅराबॅडमिंटन संघाने एकूण 12 पदके जिंकली आहेत.

ही पदके जिंकल्यानंतर भारताच्या पॅरा बॅडमिंटन संघाचा खेळाडू आणि कांस्यपदक विजेता सुकांत कदमने भारताचे पंतप्रधान नंरेंद्र मोदींना ट्विट करत त्यांना 12 मेडल जिंकणाऱ्या भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंची भेट घेण्याची विनंती केली आहे.

या विनंतीनंतर नरेंद्र मोदींनी भारताच्या पॅरा बॅडमिंटनपटूंचे ट्विट करत अभिनंदन केले आहे.

सिंधूने रविवारी वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा इतिहास रचल्यानंतर तिची मोदींनी भेट घेतली होती.

त्यानंतर सुकांत कदमने ट्विट केले की ‘सन्माननीय नरेंद्र मोदी, आम्ही पॅरा बॅडमिंटनपटूंनीसुद्धा पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 12 पदके जिंकली आहेत आणि आम्हालाही तूमचे आशिर्वाद हवे आहेत. तूम्हाला विनंती आहे की आम्हाला तूम्हाला भेटण्याची संधी मिळावी, आम्ही ही संधी एशियन गेम्सनंतर गमावली होती.’

Loading...

त्याचबरोबर या स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीत 2 सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रमोद भागतनेही ट्विट केले आहे की ‘सन्माननीय नरेंद्र मोदी सर, विनंती आहे की आम्हाला तूम्हाला भेटण्याची संधी मिळावी. आम्ही क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी त्यांचा वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत.’

या ट्विट्सनंतर मोदींनी अभिनंदनपर ट्विट केले की ‘130 कोटी भारतीयांना बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये 12 पदके जिंकणाऱ्या भारतीय पॅरा बॅडमिंटनपटूंच्या संघाचा अभिमान आहे. संपूर्ण संघाचे अभिनंदन. तूमचे यश आनंददायी आणि प्रेरणा देणारे आहे.’

Loading...

भारताच्या पॅराबॅडमिंटन संघाने 3 सुवर्णपदके, 4 रौप्यपदके आणि 5 कांस्यपदके असे 12 पदके जिंकली आहेत.

या यशानंतर भारताचे क्रिडामंत्री किरण रिजिजू यांनी पॅराबॅडमिंटनपटूंचा सन्मान केला आहे. पॅरा ऍथलिट्सला अधिक रोखबक्षीस मिळण्यासाठी सुधारणा करण्यात आलेल्या धोरणानुसार  किरण रिजिजू यांनी पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना एकूण 1.82 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

त्या अफलातून खेळीमुळे एका रस्त्यालाच दिले बेन स्टोक्सचे नाव

व्हिडिओ: क्रिकेटचे असे समालोचन कधी पाहिले आहे का?

भारताचा हा दिग्गज कर्णधार म्हणतो, टीम इंडियाने धोनीशिवाय खेळण्याची सवय लावायला हवी

Loading...
You might also like
Loading...