21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने(कॅब) रविवारी 15 जणांच्या बंगाल संघाची निवड केली आहे. या संघात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धीमान सहाचाही समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे तो खांद्याच्या दुखापतीनंतर जवळ जवळ नऊ महिन्यांनी स्पर्धांत्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्याने मागीलवर्षी 25 मेला सनरायझर्स हैद्राबाद संघाकडून कोलकता नाईट रायडर्स संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला खांद्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते.
त्याच्या पुनरागमनाबद्दल सहा म्हणाला, ‘मी या स्पर्धेत साधारण विश्रांतीनंतर जसे खेळतात तसेच खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासाठी ही मोसमाची सुरुवातच आहे.’
सहाच्या अनुपस्थितीत भारतीय संघात रिषभ पंतने यष्टीरक्षक म्हणून आपली जागा पक्की केली आहे. पण जर सहानेही अगामी काळात चांगली कामगिरी केली तर यष्टीरक्षक म्हणून कोणाला पसंती द्यायची हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असणार आहे.
मात्र भारतीय संघातील निवडीबद्दल जास्त विचार करत नसल्याचे सांगताना सहा म्हणाला, ‘मी कधीही निवडीचा विचार करुन क्रिकेट खेळत नाही. ते काही माझ्या हातात नाही. मी माझ्या आवाक्यात काय आहे यावर लक्ष केंद्रित करतो. तीच माझी कामगिरी आहे. मला मिळणाऱ्या सर्वच संधींचा मी पुरेपुर वापर करणार आहे.’
सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेतील बंगालचा पहिला सामाना त्यांच्या ड गटातील मिझोराम संघाविरुद्ध कटक येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी बंगाल संघाचे कर्णधारपद मनोज तिवारी सांभाळणार आहे. तसेच अभिमन्यू ईश्वरन हा उपकर्णधार असणार आहे.
या स्पर्धेतील सर्व सामने कटक येथे होणार आहेत. बंगाल बरोबरच या स्पर्धेसाठी ड गटात मिझोराम, कर्नाटक, आसाम, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडीशा संघाचा समावेश आहे.
असा आहे बंगालचा संघ-
मनोज तिवारी (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), वृद्धीमान सहा, श्रीवत्स गोस्वामी, विवेक सिंग, ऋतिक चटर्जी, ऋत्विक रॉय चौधरी, शाहबाज अहमद, प्रदीप्ता प्रमाणिक, कनिष्क सेठ, अशोक डिंडा, सयान घोष, इशान पोरेल, प्रयास रे बर्मन आणि अयान भट्टाचार्जी.
महत्त्वाच्या बातम्या-
–आयपीएल २०१९ च्या सुरुवातीलाच धोनी-कोहली येणार आमने-सामने
–या कारणामुळे केएल राहुलची ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियातील जागा झाली पक्की
–पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटला बसला हा मोठा धक्का