---Advertisement---

तिसरा डोळा! आजपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचेच लक्ष

T Natarajan, Virat Kohli, Hardik Pandya
---Advertisement---

कसोटी आणि टी-२० मालिकेत इंग्लंडचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिसीय मालिकेवर असेल. पहिल्या कसोटी मालिकेत भारताने इंग्लंडला 3-1 ने पराभूत केले आणि त्यानंतर टी-20 मालिकादेखील 3-2 अशा फरकाने जिंकली. भारतीय संघाने आतापर्यंत या दौऱ्यातील दोन्ही मालिका जिंकल्याने या संघातील खेळाडू एकदिवसीय मालिकेला उच्च मनोबलाने सुरुवात करणार आहेत. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडू खूप महत्त्वाचे ठरू शकतात.

तर बघूया, कोण आहेत हे खेळाडू?

1.रोहित शर्मा
सध्या संपूर्ण वनडे मालिकेत जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज रोहित शर्मावर सर्वांचे लक्ष लागून आहे. रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके ठोकली आहेत. याबरोबरच नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्यामुळे इंग्लड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितकडून संघाला बऱ्याच अपेक्षा असणार आहेत.

2.विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. तो तब्बल ३ वेळा ५० धावांचा आकडा पार करत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही प्रत्येकाची नजर विराटवर असेल. अशा परिस्थितीत विराट आपल्या शतकाचा दुष्काळ संपवण्याचाही प्रयत्न करेल.

3.हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात मोठा सामना विजेता खेळाडू असून पुन्हा एकदा त्याने सर्वोत्तम खेळी करून डावाचा उत्तम शेवट करावा असे अपेक्षित आहे. पांड्या कठीण परिस्थितीमध्ये संघासाठी गोलंदाजीही करू शकतो.

4.भुवनेश्वर कुमार
भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीत संघाचे नेतृत्व करेल. दुखापतीनंतर काही काळाने भुवीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. टी-20 मालिकेतही त्याची कामगिरी चांगली राहीली होती.

5.टी नटराजन
ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मालिकेत टी नटराजनने चमकदार कामगिरी केली होती. नटराजनकडे शेवटच्या काही षटकांत शानदार यॉर्कर टाकण्याची कला आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारला नटराजन चांगल्या प्रकारे साथ देऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात होणाऱ्या वनडेत ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळणार भारतीय संघाकडून वनडे पदार्पणाची संधी!

टी२० मालिकेत संघाबाहेर ठेवलेला ‘हा’ दिग्गज संपवणार इंग्लंडच्या पराभवाची साडेसाती, टीम इंडिया नमोहरण करायला झालाय सज्ज

…आणि कर्णधार विराट कोहली भर पत्रकार परिषदेत गाणं म्हणू लागला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---