---Advertisement---

या ५ निकषांच्या आधारावर शास्त्रींची झाली टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी फेरनिवड

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2019 3:19 PM
---Advertisement---

काल(16 ऑगस्ट) बीसीसीआयच्या सल्लागार समीतीने वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती केली आहे. या सल्लागार समीतीमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश होता.

या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने शास्त्रींसह माईक हेसन, टॉम मूडी, फिल सिमन्स, लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग या 6 जणांची अंतिम उमेदवार म्हणून निवड केली होती. पण सिमन्स यांनी मुलाखती आधीच माघार घेतली. त्यामुळे सल्लागार समीतीने अन्य पाच जणांच्याच मुलाखती घेतल्या.

या मुलाखतीनंतर शास्त्री, हेसन आणि मूडी यांची पहिल्या तीनमध्ये निवड झाली. पण अखेर या सर्वांमध्ये शास्त्री सरस ठरले. त्यामुळे आता पुढील दोन वर्षे शास्त्री भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कायम असणार आहेत.

शास्त्रींची निवड ही 5 निकषांवर करण्यात आली. ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यांना 5 निकषांवर गुण देण्यात आले. यामध्ये शास्त्रीं यांनी अन्य उमेदवारांपेक्षा जास्त गुण मिळवत बाजी मारली.

प्रशिक्षक निवडण्यासाठी ज्या निकषांचा विचार करण्यात आला ते निकष म्हणजे- 1)प्रशिक्षकाचे तत्वज्ञान 2)प्रशिक्षक म्हणून अनुभव 3)प्रशिक्षक म्हणून मिळवलेले यश 4) संवाद कौशल्य 5)आधुनिक प्रशिक्षण साधनांचे ज्ञान.

या 5 निकषांवर शास्त्रींची प्रशिक्षकपदी फेरनिवड ही एकमताने केली असल्याचे कपिल देव यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांनी दिलेल्या मुलाखतीबद्दल कपिल म्हणाले, ‘आम्ही कोणाला किती गुण दिले याची चर्चा केली नाही. जेव्हा आम्ही ते सर्व गुण एकत्र केले तेव्हा उमेदवारांच्या गुणांमध्ये खूप कमी फरक होता.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

भारताविरुद्ध सराव सामन्यासाठी असा आहे विंडीजचा संघ, या दोन महत्त्वाच्या खेळाडूंचाही समावेश

सचिनला जे काम २०० कसोटीत जमले ते या गोलंदाजाने ६६ कसोटीतच केले

संपूर्ण यादी: आत्तापर्यंत या दिग्गजांनी सांभाळले आहे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment