कोणत्याही खेळाडूसाठी किंवा संघासाठी प्रशिक्षक हा महत्त्वाचा व्यक्ती असतो. तो एखाद्या खेळाडूला घडवत असतो, तर जेव्हा तो एका संघाबरोबर असतो तेव्हा संपूर्ण संघाचा मार्गदर्शक असतो. प्रत्येक संघाच्या यशअपयशामागच्या तो पडद्यामागील हिरो असतो. आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघालाही अनेक दिग्गज प्रशिक्षक मिळाले. भारतीय संघाने आजपर्यंत केलेल्या प्रगतीमध्ये या प्रशिक्षकांचाही मोठा वाटा आहे.
भारतीय क्रिकेट संघाला सर्वात पहिल्यांदा प्रशिक्षक 1990-91 दरम्यान मिळाला. त्यानंतर भारतीय संघाला बिशन सिंग बेदी, संदिप पाटिल, अंशुमन गायकवाड, कपिल देव, रवी शास्त्री असे काही भारतीय प्रशिक्षक लाभले. त्याचबरोबर भारताला जॉन राईट, गॅरी कर्स्टन, ग्रेग चॅपेल, डंकन फ्लेचर असे परदेशी प्रशिक्षक मिळाले. या सर्वांनी भारतीय क्रिकेटसाठी प्रशिक्षक म्हणून त्यांने मोठे योगदान दिले आहे.
सध्या भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचे नियमित मुख्य प्रशिक्षक आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही भारताच्या प्रशिक्षकपदाची भुमिका बजावली आहे. त्यांनी जून महिन्यात आयर्लंडवर गेलेल्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले होते. या दौऱ्यात खेळली गेलेली टी२० मालिका भारताने २-० अशी जिंकली होती.
भारतीय संघाला आत्तापर्यंत मिळालेले मुख्य प्रशिक्षक –
1990-1991 – बिशन सिंग बेदी
1991-1992: अब्बास अली बेग
1992-1996: अजित वाडेकर
1996: संदीप पाटील
1996-1997: मदन लाल
1997-1999: अंशुमन गायकवाड
1999-2000: कपिल देव
2000-2000: अंशुमन गायकवाड
2000-2005: जॉन राइट
2005-2007: ग्रेग चॅपल
2007 / 08-2011: गॅरी कर्स्टन
2011-2015: डंकन फ्लेचर
2015-2016: रवी शास्त्री (संघ संचालक)
2016-2017: अनिल कुंबळे
2017 -2019: रवी शास्त्री
2019 -2021: रवी शास्त्री
2021 – राहुल द्रविड*
2022 – व्हीव्हीएस लक्ष्मण*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडमधील भारतासाठी ‘हे’ मैदान ठरलयं लकी! झाली ऐतिहासिक विजयाची नोंद, वाचा सविस्तर
हे नवीनच! टॉवेलमुळे गोलंदाजाच्या मेहनतीवर फिरले पाणी, बाद झालेला फलंदाज राहिला नाबाद
‘आता काही दिवस फक्त रणजीच खेळ’, कोहलीला ‘या’ दिग्गजाने दिला सल्ला