---Advertisement---

चेन्नईचे ‘हे’ 5 खेळाडू मुंबईला करू शकतात चारीमुंड्या चीत, शेवटचे नाव अत्यंत महत्वाचे । MI Vs CSK IPL 2024

CSK-IPL2024
---Advertisement---

आयपीएलमधील दोन दादा संघ अर्थात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज ( दि.. 14) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. रविवारची संध्याकाळ या दोन तुल्यबळ संघाच्या लढतीने अधिक रोमांचक ठरेल यात शंका नाही. यंदाच्या मोसमात दर्जेदार कामगिरी केल्याने चेन्नईचा संघ टॉप फोरमध्ये आहे. दुसरीकडे मुंबईची यंदाची सुरुवात तितकी खास झालेली नाही परंतू, मागील दोन सामन्यात विजय मिळवून मुंबईचा संघ लयीत आल्याचे दिसत आहे. अशात आजच्या सामन्यात कोण वरचड असणार, याचीच चर्चा होत आहे. त्यात चेन्नईचे काही खेळाडू सर्वांच्यात नजरेत भरलेले आहेत. तर हे पाच खेळाडू चालले तर निश्चित मुंबईसाठी ते जड जाऊ शकतात.

चेन्नईचे हे 5 खेळाडू मुंबईवर पडू शकतात भारी –
अजिंक्य रहाणे –
मुळ मुंबईकर असलेला अजिंक्य मुंबईसाठी धोकादायक ठरू शकतो. रणजी ट्रॉफीत मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील महत्त्वाचा खेळाडू आहे. वानखेडेवर आपल्या मातीत खेळताना अजिंक्य रहाणे मुंबईला जड जाऊ शकतो.

शिवम दुबे – चेन्नईकडून खेळणारा अष्टपैलू शिवम दुबे सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. दुबे हा मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरू शकतो. मुंबईच्या मातीत खेळलेल्या शिवमला वानखेडेचा बऱ्यापैकी अंदाज आहे.

शार्दुल ठाकूर – आणखीन एक महाराष्ट्रीयन खेळाडू असलेला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा शार्दुल ठाकुर मुंबई इंडियन्ससाठी वरचड ठरू ठकतो. रणजी ट्रॉफीत शार्दूलने चांगली कामगिरी केलीये. त्यामुळे वानखेडेवर फलंदाजी आणि गोलंदाजीत तो कमाल करू शकतो.

तुषार देशपांडे – चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे हाही सध्या चांगल्या फॉर्मात आहे. रणजी ट्रॉफीत त्याने देखील चांगली गोलंदाजी केलीये. तसेच वानखेडेच्या खेळपट्टीचा त्याला चांगला अंदाज आहे. त्यामुळे तो कदाचित मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.

ऋतुराज गायकवाड – चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि पुणेकर ऋतुराज गायकवाड हाही मुंबईसाठी आज नक्कीच डोकेदुखी असणार, यात शंका नाही. पुणेकर असला तरीही वानखेडेचे वातावरण ऋतुराजला चांगलेच मानवतं. त्यामुळे तोही आज आक्रमक फलंदाजी करून मुंबईला दणका देऊ शकतो.

अधिक वाचा – 
– काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
– अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय
– मुंबई इंडियन्सनं शेअर केला हार्दिक आणि अगस्त्यचा क्यूट व्हिडिओ, तुम्हीही एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---