---Advertisement---

काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात रविवारी (14 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल.

या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा टीमची बस चालवताना दिसतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बससमोर चाहत्यांची मोठी गर्दी आहे. त्यांना पाहून रोहित शर्मानं स्वतःच गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये रोहित शिवाय मुंबई इंडियन्सचे इतर खेळाडूही दिसत आहेत.

रोहित शर्मा बस चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचा हा नवा अवतार खूप आवडला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना हसू आवरता येणं शक्य नाही. सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर सातत्यानं कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून या हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. सध्या हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ  5 सामन्यांत 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. यावर्षी मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्यांना सलग 3 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यानंतर हार्दिक पांड्याच्या संघानं शानदार पुनरागमन केलं. मुंबई इंडियन्सनं आधी घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 7 विकेट्सनं पराभव केला.

आता मुंबई इंडियन्सचा आगामी सामना रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध होणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जनं आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवले असून 2 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालाय. ते गुणतालिकेत 6 अंकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सनं शेअर केला हार्दिक आणि अगस्त्यचा क्यूट व्हिडिओ, तुम्हीही एकदा पाहाच

6 चेंडूत 6 षटकार! नेपाळच्या क्रिकेटपटूनं केला कहर, युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी

ना विराट, ना रोहित….ट्रेंट बोल्ट म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज माझा आवडता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---