ना विराट, ना रोहित….ट्रेंट बोल्ट म्हणाला, ‘हा’ भारतीय फलंदाज माझा आवडता

ट्रेंट बोल्टला जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानलं जातं. तो त्याच्या स्विंग होणाऱ्या चेंडून भल्याभल्यांच्या दांड्या गूल करू शकतो. बोल्ट सध्या भारतामध्ये आयपीएल खेळण्यासाठी आला आहे. दरम्यान, त्याला प्रश्न विचारण्यात आला की, तुझा आवडता भारतीय फलंदाज कोण? यावर त्यानं जे उत्तर दिलं ते ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. राजस्थाननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बोल्टसोबत राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर दिसतोय. बटलर बोल्टला प्रश्न विचारतो की, “तुझ्या आवडत्या भारतीय फलंदाजाचं नाव काय?”, यावर ट्रेंट बोल्टनं अनपेक्षित उत्तर दिलं. बोल्टनं विराट कोहली किंवा रोहित शर्माचं नाव घेतलं नाही. त्याऐवजी त्यानं लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचं नाव घेतलं. तुम्ही हा व्हिडिओ खाली पाहू शकता.
From his favourite wicket to one player he would like at the Royals, here’s Jos and Boulty like never before 🔥😂 pic.twitter.com/F7524zWiQZ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 12, 2024
राजस्थान रॉयल्सनं आयपीएल 2024 च्या हंगामाला धमाकेदार सुरुवात केली आहे. संघ गुणतालिकेत 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थाननं खेळलेल्या 5 पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र गेल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून मात मिळाली होती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांसाठी चाचपडणारा जोस बटलर आता फॉर्ममध्ये आला आहे. त्यानं आरसीबीविरुद्ध धावांचा पाठलाग करताना शानदार शतक झळकावलं होतं. शिवाय कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग देखील सातत्यानं धावा करत आहेत.
गोलंदाजीत फिरकीपटू युजवेंद्र चहल संघासाठी चमकदार कामगिरी करतोय. त्याच्या नावे 5 सामन्यांमध्ये 10 बळी असून, पर्पल कॅपच्या शर्यतीत तो जसप्रीत बुमराहसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. राजस्थानसाठी चिंतेची एकच बाब म्हणजे सलामीवीर यशस्वी जयस्वालचा फॉर्म. आयपीएल सुरू होण्यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वीनं खोऱ्यानं धावा गोळा केल्या होत्या. मात्र आयपीएलच्या या हंगामात तो आतापर्यंत विशेष अशी कामगिरी करू शकलेला नाही. काही सामन्यांमध्ये त्याला चांगली सुरुवात मिळाली, मात्र तो त्याचं रुपांतर मोठ्या खेळीत करू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
गुणतालिकेत तळाशी असलेली आरसीबी अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते का? जाणून घ्या