इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये 2008 पासून अनेक खेळाडू खेळत आहेत. आयपीएलने युवा खेळाडूंनासुद्धा स्टार आणि दिग्गज खेळाडूंसह खेळण्याची संधी दिली. आयपीएल अनेक खेळाडूंच्या कारकीर्दीत मैलाचा दगड ठरला आहे. या 12 वर्षात अनेक फलंदाजांनी आपल्या कामगिरीने छाप पाडली. असेही काही सामने होते जे क्रिकेटप्रेमी नेहमीच लक्षात ठेवतील. आतापर्यंत 100 हून अधिक खेळाडूंनी अर्धशतके झळकावली आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या पाच अव्वल फलंदाजांची नावे सांगणार आहोत ज्यांनी डावात सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत .
5. रोहित शर्मा – (1 शतक आणि 36 अर्धशतके)
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा हा केवळ मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू नाही तर आयपीएलमधील यशस्वी कर्णधारही आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. तो मुंबई इंडियन्समध्ये जाण्यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळला. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 188 सामने खेळले असून 31.60 च्या सरासरीने 4898 धावा केल्या. यात त्याचे 1 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याने 37 वेळा 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
4. शिखर धवन – (37 अर्धशतके)
आयपीएलमध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवन दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळत आहे. यापूर्वी तो सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 159 सामने खेळले असून 33.42 च्या सरासरीने 4589 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 37 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, अद्याप तो आयपीएलमध्ये शतक ठोकू शकलेला नाही. त्यामुळे या अर्धशतकांसह तो चौथ्या क्रमांकावर आहे.
3. सुरेश रैना – (1 शतक आणि 38 अर्धशतके)
‘मिस्टर आयपीएल’ म्हणून ओळखले जाणारा सुरेश रैना हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे. याला अपवाद केवळ 2016 आणि 2017 हंगाम आहेत. तो गुजरात लायन्सकडून खेळला. कारण चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्ष बंदी घालण्यात आली होती. त्याने आतापर्यंत 193 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 33.34 च्या सरासरीने 5368 धावा केल्या आहेत. त्याने 50 किंवा त्याहून अधिक 39 वेळा धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 1 शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीमध्ये तो तिसर्या क्रमांकावर आहे.
2. विराट कोहली – (5 शतक आणि 36 अर्धशतके)
भारतीय कर्णधार विराट कोहलीही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करतो. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. सध्या तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 177 सामन्यात 37.84 च्या सरासरीने 5412 धावा केल्या आहेत. त्याने 41 वेळा 50 किंवा त्याहून अधिक वेळा धावा केल्या आहेत. यात 5 शतके आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. त्या यादीत तो दुसर्या क्रमांकावर आहे.
1. डेव्हिड वॉर्नर – (4 शतक आणि 44 अर्धशतके)
ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक मोठे खेळी खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या आधी तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 126 सामने खेळले आहेत आणि 43.17 च्या सरासरीने 4708 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने 50 किंवा त्याहून अधिक वेळा 48 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 4 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. म्हणून तो या यादीत अव्वल आहे.
ट्रेंडिंग लेख –
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
आयपीएल २०२० : या ४ दिग्गज खेळाडूंना क्वचितच मिळू शकेल खेळण्याची संधी
महत्त्वाच्या बातम्या –
बॅट दुरुस्त केलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आला पुढे; केली ‘ही’ मदत
या देशातील क्रिकेटर्स त्यांच्या क्रिकेट बोर्डाला म्हणाले, ‘उशीर होण्याआधीच क्रिकेटला वाचवा’
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत ‘हे’ बदल, या दिग्गजाचा सल्ला