fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली

September 5, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मुंबई..भारतीय क्रिकेटची पंढरी.. आजवर भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक पिढीला एक तरी सुपरस्टार दिलेले क्रिकेटवेडे शहर..विजय हजारेंपासून आजच्या पृथ्वी शॉपर्यंत दर्जेदार फलंदाज देण्याची परंपरा मुंबईने जोपासली आहे…याच, मुंबई क्रिकेटने जगाला सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर दिलेत.. सध्या भारतीय महिला क्रिकेटमध्ये ज्या तीन अव्वल महिला क्रिकेटपटूंना सर्वोत्कृष्ट मानले जाते, त्यापैकी एक नाव म्हणजे मुंबईची मुलगी जेमिमा रॉड्रिग्ज… जेमी या टोपणनावाने ओळखली जाणारी जेमिमा आज वीस वर्षाची होतेय.

मुंबई महानगरातील भांडुपसारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या उपनगरात तिचा जन्म झाला. एनोच आणि एली या भावंडांसोबत वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ती राहत असलेल्या ठिकाणी क्रिकेटसाठी तितकेसे पोषक वातावरण नसल्याने तिचे वडील इवान तिला घेऊन शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत जात. तिचे वडीलच तिचे पहिले प्रशिक्षक. खरंतर, इवान हे शालेय स्तरावर प्रशिक्षण देण्यास पात्र असल्याने क्रिकेटच्या सर्व बारकाईचा त्यांना अभ्यास होताच. आपल्या मुलीला खडतर प्रशिक्षण देताना ते अजिबात दयामाया दाखवत नसत.

जेमी चौथ्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवत असली तरी, ती क्रिकेट तितकेच प्रेम हॉकीवर देखील करते. भांडुपमध्ये अनेक हॉकीचाहते असल्याने ती हॉकी खेळू लागली. तिने हॉकीमध्ये इतकी निपुणता मिळवली की, तिची महाराष्ट्र १६ वर्षाखालील व महाराष्ट्र १९ वर्षाखालील महिला हॉकी संघात निवड झाली होती. आजही ती मोकळ्या वेळात हॉकी खेळण्यास प्राधान्य देते..

हॉकीमध्ये राज्यस्तरावर निवड झाली तरी तीने क्रिकेट खेळणे सोडले नव्हते. वयाच्या अवघ्या साडे बाराव्या वर्षी तिने मुंबईसाठी १९ वर्षाखालील संघात पदार्पण केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच एकदिवसीय स्पर्धेत तिने सौराष्ट्राविरुद्ध द्विशतक झळकावले. अशी कामगिरी करणारी ती स्मृती मंधानानंतर केवळ दुसरी खेळाडू होती. गुजरात विरुद्ध देखील तिने १७८ धावांची खेळी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये १८ वर्षाची होण्या अगोदरच तिने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती.

📽️ On her 20th birthday, watch Jemimah Rodrigues talk about her love for the game and what made her choose cricket 🎉 pic.twitter.com/bdtYyl8aa2

— ICC (@ICC) September 5, 2020

महिला क्रिकेटमध्ये जर कोणी इतक्या वेगाने प्रगती करत असेल तर संधी खूप लवकर मिळते. हीच गोष्ट जेमिमासोबत झाली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तिने १७ व्या वर्षी भारतीय संघाची जर्सी अंगावर चढवली. जेमिमाच्या आक्रमक फलंदाजीने प्रभावित होऊन तिची निवड २०१८ च्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय संघात करण्यात आली. जेमिमा आता मिताली राज, स्मृती मंधाना व हरमनप्रीत कौर या वरिष्ठ खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत होती. न्यूझीलंडविरुद्ध नेपियर वनडेमध्ये नाबाद ८१ धावांच्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जेमिमाची प्रगती पाहून बेसलाईन वेंचर्स या क्रीडा व्यवस्थापन करणाऱ्या समूहाने तिला करारबद्ध केले. हा समूह भारतातील प्रमुख खेळाडूंचे व्यवस्थापन करतो. यात रवींद्र जडेजा, पी व्ही सिंधू सारखे क्रीडा जगतातील अनेक सितारे आहेत.

Begin your Sunday on a musical note courtesy Lil J! 🎶🎶

Get ready to be mesmerized as our in-house rockstar @JemiRodrigues shows off her singing and ukulele skills 😎🎤 pic.twitter.com/DtLs7c6X7i

— BCCI Women (@BCCIWomen) May 24, 2020

२०१९ आयपीएलमध्ये वुमन्स टी२० चॅलेंज या स्पर्धेत जगभरातील अव्वल महिला खेळाडूंना पछाडत तिने सर्वाधिक धावा काढल्या. प्रत्येक सामन्यात तिच्या नावे अर्धशतक लागले. त्याचे बक्षीस म्हणून इंग्लंडमधील यॉर्कशायर काउंटी क्‍लबने आपल्या महिला संघासाठी तिला करारबद्ध केले.

इतक्या मोठ्या पातळीवर निवड झाल्यानंतर त्या संधीचे सोने करणार नाही ती जेमिमा कसली ?
किया सुपर लीग टी२० स्पर्धेत यॉर्कशायर डायमंडसाठी खेळताना तिने अवघ्या ५८ चेंडूत ११२ धावा फटकावल्या. हे शतक त्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले होते. या विक्रमी खेळीत १७ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. तिची ही खेळी पाहून, संपूर्ण क्रिकेटजगतातील एकही असा खेळाडू नव्हता ज्याने तिची प्रशंसा केली नाही.

🧢 60 internationals
🙌 1302 runs
🥈 @T20WorldCup 2020 runner-up
💃🎸 An excellent sport!

Happy 20th birthday to India's @JemiRodrigues 🎉 pic.twitter.com/ehUdGQc3QV

— ICC (@ICC) September 5, 2020

सोशल मीडियावर सतत व्यस्त असणारी, गिटार वाजवणारी, सहकारी खेळाडूंसोबत प्रँक करण्यात आघाडीवर असणारी चुलबुली जेमी वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी दोन टी२० विश्वचषक स्पर्धा खेळलीय. जेमिमाकडे भारतीय संघातील सर्वाधिक जबाबदार फलंदाज म्हणून पाहिले जाते. शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांच्यासह जेमिमाने भारतीय महिला क्रिकेट सुरक्षित हातात असल्याची ग्वाही दिली आहे.

ट्रेंडिंग लेख –

बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत

महत्त्वाच्या बातम्या –

सीपीएलमध्ये या गोलंदाजांने केला जोरदार स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सीएसके संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल? चाहत्य‍ाने केली विचारणा; फ्रेंचायझीचे आश्चर्यकारक उत्तर

दोन आयपीएल संघ करणार होते त्याला आपल्या ताफ्यात सामील, परंतू बोर्डाने घातला खोडा


Previous Post

सीपीएलमध्ये या गोलंदाजांने केला जोरदार स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Next Post

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत ‘हे’ बदल, या दिग्गजाचा सल्ला

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post

इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर कसोटी क्रिकेटमध्ये व्हावेत 'हे' बदल, या दिग्गजाचा सल्ला

Photo Courtesy: Twitter/ ICC

बॅट दुरुस्त केलेल्या अशरफ चाचांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आला पुढे; केली 'ही' मदत

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा कायम; ब्रिजेश पटेल यांनी सांगितली नवी तारीख

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.