---Advertisement---

हार्दिक अन् पंतवर खूपच तापला कर्णधार रोहित, ड्रेसिंग रूममध्ये संगठच काढला ‘जाळ अन् धूर’

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 9:23 AM
Rohit-Angry-OnPant-Pandya
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या मैदानावर झालेला आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाकडून या सामन्यात अनुभवी हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांनी निराशा केली. भारतीय संघाला मोठ्या खेळीची गरज असताना हे दोघे खराब शॉट खेळून स्वस्तात बाद झाले. यामुळे कर्णधार रोहित शर्मा याने ड्रेसिंग रूममध्ये त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ड्रेसिंग रूममधील हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

कर्णधार रोहित (Captain Rohit Sharma) आणि उपकर्णधार केएल राहुल यांनी संघाला आक्रमक सुरुवात दिल्यानंतर दोघेही एकापाठोपाठ एका षटकात बाद झाले. चौथ्या क्रमांकावरील सूर्यकुमार यादव हादेखील लवकरच पव्हेलियनला परतला. अशात यष्टीरक्षक पंत (Rishabh Pant) आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडून सावध पण विस्फोटक खेळीची अपेक्षा होती.

परंतु हार्दिक खराब फटका खेळत शून्य धावेवर बाद झाला. फक्त 2 चेंडू खेळून मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजीवर मोहम्मद नवाजच्या हाती झेल देत तो बाद झाला. त्याच्यापूर्वी पंतही खराब फटक्यामुळे बाद झाला होता. पंतने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. त्याला शादाब खानने आसिफ अलीच्या हातून झेलबाद केले.

पंत आणि हार्दिक खराब शॉट खेळून बाद झाल्याने कर्णधार रोहित खूपच नाराज दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही फोटो आणि व्हिडिओत दिसतेय की, रोहित ड्रेसिंग रूममध्ये पंत आणि हार्दिकवर राग व्यक्त करत (Rohit Sharma Angry On Pant And Hardik) आहे. रोहित हातवारे करत हा असा शॉट खेळणे चुकीचे होते, असे सांगतानाही दिसत आहे. रोहितला फार कमी वेळा इतक्या रागात पाहिले गेले आहे.

https://twitter.com/Chiku2324/status/1566449489128607745?s=20&t=QQZ6ddyR8njHwVkz8frNhA

https://twitter.com/tariqueSH/status/1566452438470516736?s=20&t=Og0qT_cSnUzSSLr5tPC0hA

पाकिस्तानने हिशोब केला बरोबर
आशिया चषकातील दुसराच साखळी फेरी सामना भारत आणि पाकिस्तान संघात झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते. यानंतर आता सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 5 विकेट्सने पराभूत करत पराभवाचा वचपा काढला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

…आणि भांडुपमधील मध्यमवर्गीय कुटूंबातील पोरगी १७व्या वर्षी भारताकडून खेळू लागली
वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा ‘प्रज्ञान ओझा’
VIDEO: अर्शदीपने झेल सोडला अन् रोहितचा पारा चढला! सामन्याच्या रोमांचक वळणावर टीम इंडियाकडून मोठी चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---