आत्माराम चव्हाण (मुंबई उपनगर) आशुतोष साळुंखे (रत्नागिरी) व विलास बेंद्रे (रत्नागिरी) ह्याची महाराष्ट्रातून पहिल्यादाच प्रो कबड्डीत पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र व्यतिरिक्त प्रो कबड्डीतील नावाजलेले पंच अजित कुमार, रोनक पटेल, राणा रणजित सिंग, कृपाशंकर शर्मा, सस्मिता दास यादी अनुभवी पंचाची सीजन ७ साठी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रो कबड्डी सीजन ७ साठी एकूण ३४ पंचाची नियुक्ती झाली असून बेलापूर , नवी मुंबई येथे त्याचे वर्कशॉप ही पार पडले. पंचाचे २ ग्रुप तयार करण्यात आले आहेत. दोन्ही ग्रुप मध्ये प्रत्येकी १५ पंच तर प्रत्येकी २ टीव्ही रेफेरी असतील. ग्रुप अ मधील पंच हैदराबाद, पटना, चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि पंचकूला लेग साठी असतील. तर ग्रुप ब मधील मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकता, जयपूर आणि नोएडा लेग साठी असणार आहेत.
ग्रुप अ: अजित कुमार (दिल्ली) कृपाशंकर शर्मा (राजस्थान), जितेश शिरवाडकर (महाराष्ट्र सुंदर राज (तामिळनाडू) रामबीर सिंग (दिल्ली), रोनक रावल (गुजरात), सस्मिता दास (ओडिसा), एस सिवनेश कुमारान (तामिळनाडू)के साधिया (तामिळनाडू), विलास बेंद्रे (महाराष्ट्र), मानस्वनी साहू (ओडिसा), पोपी दलाल (वेस्ट बंगाल), संतोष गावस (गोवा), ब्राजेश भागोरा (मध्यप्रदेश), मिथरेयी सवाराम,
टीव्ही रेफेरी: डॉ. एच व्ही नटराज, कृष्णलाल
ग्रुप बी: राणा रणजित सिंग (बिहार), आझम खान (राजस्थान), रोनक पटेल (गुजरात), मुरलीकुमार (आंध्रप्रदेश), अत्तर सिंग (हिमाचलप्रदेश), कुमारसन (तामिळनाडू) आरती बारी (महाराज) प्रज्योत मोराजकर (गोवा), आशुतोष साळुंखे (महाराष्ट्र), व्ही श्रीनू (तेलंगणा), एम कालिदास (तामिळनाडू),आत्माराम चव्हाण (महाराष्ट्र), दमयंती बोरो (आसाम), सुमन शेरावत (हरियाणा), एस सोवमीया (तामिळनाडू)
टीव्ही रेफेरी: आर डी कौशिक, जमुना






