आशिया चषक 2022 मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. परंतु त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि आशिया चषकाचे सहावे विजेतेपद देखील पटकावले. अंतिम सामन्यात रविवारी (11 सप्टेंबर) श्रीलंकन संघाने बलाढ्या वाटणाऱ्या पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाची धूळ चारली. उभय संघातील हा अंतिम सामना चांगलाच रोमांचक ठरला. सामन्यात असे काही प्रसंग घडले, जे पाहून सर्वांना आश्चर्य किंवा हसू नक्कीच आले असेल. आपण अशाच पाच प्रसांगांचा विचार या लेखात करणार आहोत.
सामन्याच्या पहिल्याच षटकात नसीम शाहने उडवला मेंडिसचा त्रिफळा –
आशिया चषकच्या या अंतिम सामन्यातील पहिले षटक नसीम शाह याने टाकले. त्याच्यासमोर श्रीलंकेचा कुसल मेडिंस होता. दोघांवर देखील स्वतःच्या संघाला चांगली सुरुवात देण्याचे आव्हान होते. अशा दबावाच्या परिस्थितीत नसीमने बाजी मारली. षटकातील पहिला चेंडू त्याने वाईड टाकला. पण त्यानंतर तिसरा चेंडू त्याने 142 किमी ताशी गतीने इंनस्विंग टाकला. हा चेंडू त्याच्या बॅट आणि पॅटच्या मधून थेट स्टंप्समध्ये घुसला आणि संघाची धावसंख्या 2 असताना श्रीलंकेला पहिला झटका मिळाला.
शादाब खानने पंचांसोबत केली मस्ती –
पावरप्लेमद्ये श्रीलंकन संघ एकापाठोपाठ विकेट्स गमावत होता. पण तेव्हाच सामन्यात एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान पंचांचा हात पकडून फलंदाजाला बाद द्या असे म्हणत होता. श्रीलंकेच्या डावातील सहाव्या षटकात हॅरिस रउफ गोलंदाजी करत होता. त्याने स्ट्राईकवर असलेल्या भानुका राजपक्षेला एक उत्कृष्ट यॉर्कर टाकला. पाकिस्तानी खेळाडूंनी यावर एलबीडब्लू साठी जोरदार अपील केली, पण पंचांना फलंदाज नबाद असल्याचे सांगितले. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने रिव्यू घेतला. पण तिसऱ्या पंचांनी देखील फलंदाज बाद नसल्याचे सांगितले. परंतु शादाव खान विकेट मिळवण्यासाठी एवढा उत्सुक होता की, त्याने स्वत पंचांचा हात वर करण्याचा प्रयत्न केला.
शादाबने भानुका राजपक्षेचा झेल सोडला आणि दुखापत देखील झाली –
श्रीलंकन संघाच्या डावातील 19 व्या षटकात देखील प्रेक्षकांचे मनोरंजन झाल्याचे दिसले. षटकातील शेवटच्या चेंडूवर भानुका राजपक्षेने मिड विकेटच्या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू सीमारेषेच्या आलीकडे आसिफ अलीच्या हातात गेला होता. परंतु तितक्यात शादाब खान हा चेंडू झेलण्यासाठी धावत आला आणि आसिफ अलीच्या अंगावर डाईव्ह देखील मारली. टक्कर एवढी जोरात होती की, शादावच्या नाकातून रक्त येऊ लागले. या अपघातानंतर सामना 10 ते 15 मिनिट थांबवला देखील गेला होता. त्यावेळी राजपक्षे 57 धावांवर खेळत होता. त्यानंतर त्याने 14 धावा केल्या आणि श्रीलंका संघ 170 धावांपर्यंत मजल मारू शकला.
पहिल्याच षटकात श्रीलंकेला खेळायला मिळाले 11 चेंडू –
पाकिस्तान संघ जेव्हा 171 धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा मैदानात आला, तेव्हा दिलशान मदुशंकाची गोलंदाजी पाहून प्रत्येकजण हैराण होता. मदुशंका या डावातील पहिले षटक घेऊन आला होता. अंतिम सामन्याचा दबाव त्याच्या गोलंदाजीत स्पष्टपणे दिसला. त्याने या षटकात तबब्ल 11 चेंडू टाकले. त्याने पहिला चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर पुढचे दोन चेंडू वाईट टाकले. त्यानंतर चेंडू देखील मदुशंकाने वाईट टाकला, जो यष्टीरक्षकाला हाती लागू शकला नाही आणि चौकार गेला. पुढचा चेंडू त्याने पुन्हा एकदा वाईड टाकला. अशा प्रकारे त्याने एकही चेंडू न टाकता पाकिस्तानला 9 धावा दिल्या होत्या. या षटकात श्रीलंकेला एकूण 12 धावा मिळाल्या.
प्रमोद मधुशनची धमाकेदार गोलंदाजी –
पाकिस्तानच्या डावातील चौथे षटक टाकण्यासाठी प्रमोद मधुशन आला होता. पहिल्या षटकात 4 धावा दिल्यामुळे श्रीलंकन संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. खेलपट्टीवर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान होते. मधुशनने बाबर आझमला लेग स्टंपवर चेंडू टाकला आणि त्याने हा चेंडू फाइन लेगच्या दिशेला उभा असलेला मधुशंकाच्या हातात मारला. मधुशंकाने कसलीही चूक न करताना झेल पकडला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर फखर जमानने कवर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, पण क्लीन बोल्ड झाला. चेंडू त्याच्या बॅटच्या आतल्या किनाऱ्याला लागला आणि स्टंप्सवर जाऊन लागला. सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेतल्यानंतर मधुशनने पाकिस्तानला सुरुवातीचे झटके दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा –
महत्वाच्या बातम्या –
वयाच्या 19 व्या वर्षी अल्कारझचे घवघवीत यश, यूएस ओपन जिंकत एटीपी क्रमवारीत पोहोचला अव्वलस्थानी
सर्वात भीषण आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेला एकमेव क्रिकेटपटू, लाराविरूद्ध केलेले नेतृत्व
वयाच्या 19 व्या वर्षी अल्कारझचे घवघवीत यश, यूएस ओपन जिंकत एटीपी क्रमवारीत पोहोचला अव्वलस्थानी