---Advertisement---

भारत-श्रीलंका मालिका संकटात? श्रीलंकेच्या पाच खेळाडूंचा नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार

On: शुक्रवार, जुलै 2, 2021 2:20 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. दौरा सुरू होण्यास १० दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच, श्रीलंका संघाच्या गोटातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

पाच खेळाडूंनी दिला करारावर स्वाक्षरी करण्यास नकार
सध्या श्रीलंका क्रिकेट अतिशय वाईट काळातून जात आहे. संघाचे मैदानावरील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून, श्रीलंका क्रिकेट बोर्ड व खेळाडूंमध्ये काही महिन्यांपासून नव्या करार पद्धतीमुळे वाद सुरू आहेत. सध्या श्रीलंकेचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. त्याचवेळी इतर खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेसाठी रेसिडेन्शिअल कॅम्पमध्ये एकत्रित होत आहेत.

मालिकेपूर्वी खेळाडूंनी नव्या करारावर स्वाक्षरी केल्यास त्यांचा भारताविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी विचार केला जाऊ शकतो, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र श्रीलंकेच्या पाच खेळाडूंनी भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. वेगवान गोलंदाज लाहिरु कुमारा, विश्वा फर्नांडो, अशेन बंडारा, लसिथ एबुलडेनिया व अष्टपैलू कसून रजिथा या पाच जणांनी करारावर स्वाक्षरी करणार नसल्याचे स्पष्ट केले. इतकंच नव्हे तर, हे सर्व खेळाडू संघाचा रेसिडेंशियल कॅम्प सोडून निघून गेले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डी सिल्वा यांनी ही माहिती दिली आहे.

अशी आहे नवी गुणांकन पद्धत
नव्या गुणांकन पद्धतीत खेळाडूंना एकूण १०० गुणांपैकी गुण देण्यात येतील. यामध्ये ५० गुण हे खेळाडूंच्या कामगिरीसाठी राखीव असतील. २० गुण तंदुरुस्ती, तर प्रत्येकी १० गुण अनुक्रमे नेतृत्व क्षमता, व्यावसायिकता व भविष्यात होऊ शकणारी कामगिरी यासाठी दिले जाणार आहेत.

तंदुरुस्तीसाठी असलेले २० गुण मिळवण्याची संधी खेळाडूंना राहील. स्किन फोल्ड चाचणीमध्ये ७५ पेक्षा कमी रेटिंग आल्यास व २ किलोमीटर अंतर ८ मिनिट ३५ सेकंदांमध्ये पार केल्यास हे पूर्ण २० गुण खेळाडूस दिले जातील. खेळाडूंना वेतनासाठी वेगवेगळे गट देखील तयार केले गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताचा ‘हा’ गोलंदाज अँडरसनच्या बरोबरीचा, तरीही त्याला इंग्लंडला का नेलं नाही?

ऑस्ट्रेलिया संघापुढे मोठा पेच, टी२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठल्यास होणार मोठे नुकसान

आनंदाची बातमी! बीसीसीआयच्या ‘या’ महत्त्वपुर्ण विनंतीला ईसीबीचा होकार, विराटसेनेचं काम झालं सोपं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---