---Advertisement---

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांची कोरोनाविरुद्ध झुंज सुरू, घरून हालवण्यात आलं रुग्णालयात

On: मंगळवार, मे 25, 2021 7:15 AM
---Advertisement---

भारत देशात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कोणीही या महामीराच्या तावडीतून सुटलेले नाही. नुकतीच भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनाही चंदीगडमध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले होते. परंतु सोमवारी (२४ मे) त्यांना रुग्णालयात हालवण्यात आले आहे.

मिल्खा सिंग यांचा मुलगा आणि प्रसिद्ध गोल्फर जीव मिल्खा सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जीव यांनी सांगितले आहे.

पीटीआयशी बोलताना जीव म्हणाले की, “मिल्खा सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना घरी अशक्तपणा जाणवत होता. कालपासून त्यांनी जेवणही करणे कमी केले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. असे असले तरीही, त्यांची तब्येत ठीक दिसत आहे. परंतु आम्हाला वाटले की, त्यांना घरी ठेवण्यापेक्षा रुग्णालयात दाखल करणे अधिक सुरक्षित ठरेल. तिथे ते अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील.”

जीव आपले वडील मिल्खा सिंग कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शनिवारी दुबईवरुन घरी परतले आहेत.

कुटुंबीय सुरक्षित
मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या घरातील २ नोकरांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. सुखद बाब म्हणजे, त्यांची पत्नी निर्मला मिल्खा सिंग, सून कुदरत आणि नातू हरजय मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

‘फ्लाइंग सिख’ म्हणून आहेत प्रसिद्ध 
मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी ४ तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण; घरातच केलं स्वत:ला क्वारंटाईन

विराट-अनुष्काची पुन्हा अभिमानास्पद कामगिरी, दुर्मिळ आजार असलेल्या अयांशला केली ‘ही’ मदत

Video: मुलाला कोरोना टेस्ट करण्यासाठी झाली मारहाण? हरभजनने व्यक्त केला संताप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---