---Advertisement---

‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण; घरातच केलं स्वत:ला क्वारंटाईन

On: गुरूवार, मे 20, 2021 2:39 PM
---Advertisement---

भारत देशात सध्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गोरगरिबांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटीपर्यंत कोणही या महामीराच्या तावडीतून सुटलेले नाहीत. नुकतीच भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांनाही चंदीगडमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना बुधवारी रात्री जवळपास १०१ डिग्री ताप असल्याचे आढळले होते. त्यानंतर चाचणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. सध्या त्यांनी स्वतला घरातच विलगीकरणात ठेवले आहे.

मिल्खा सिंग यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या घरातील २ नोकरांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सुखद बाब म्हणजे, त्यांची पत्नी निर्मला मिल्खा सिंग, सून कुदरत आणि नातू हरजय मिल्खा सिंग यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि फ्लाइंग सिख ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी ४ तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी दिग्गजाने निवडला भारतीय संघ, फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूवर लावला मोठा डाव

ट्वेंटी ट्वेंटीत एकही शतक न झळकावता ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, धोनीचाही समावेश

फिट अँड फाईन… जिममध्ये घाम गाळत ‘जड्डू’ इंग्लंड दौरा गाजवण्यास होतोय सज्ज; बघा सरावाचा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---