---Advertisement---

ट्वेंटी ट्वेंटीत एकही शतक न झळकावता ‘या’ फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, धोनीचाही समावेश

On: गुरूवार, मे 20, 2021 1:52 PM
Virat Kohli and MS Dhoni
---Advertisement---

ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा आतापर्यंत केवळ ख्रिस गेल, किरोन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हिड वॉर्नर या 4 फलंदाजांनी पार केला आहे. या यादीतील फलंदाजांपैकी 3 फलंदाज म्हणजेच क्रिस गेल (22 शतके), डेव्हिड वॉर्नर (8 शतके) आणि कोरोन पोलार्ड (1 शतक) यांनी शतक ठोकलेले आहे. पण ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकही शतक न करता 10 हजार धावा करणारा शोएब मलिक हा एकमेव फलंदाज आहे.

शोएबने आतापर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत 37.06 च्या सरासरीने 417 सामन्यांच्या 389 डावात एकूण 10488 धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या ही नाबाद 95 धावा राहिलेली आहे. आपल्या कारकीर्दीदरम्यान शोएबचा स्ट्राइक रेट 125.99 राहिलेला आहे. ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतक न करता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन दुसर्‍या क्रमांकावर आहे. मॉर्गनने आतापर्यंत 7004 धावा केलेल्या आहेत.

शतक न करता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकन दिग्गज कुमार संगकारा तिसर्‍या क्रमांकावर आहे. संगकाराने आपल्या ट्वेंटी ट्वेंटी कारकीर्दीत एकूण 6937 धावा केलेल्या आहेत. तसेच भारताचा खेळाडू रॉबिन उथप्पा 6861 धावांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर तर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी 6558 धावाांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शतक न करता सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज-
शोएब मलिक – 10488 धावा ( पाकिस्तान)
इयॉन मॉर्गन – 7004 धावा( इंग्लंड)
कुमार संगकारा – 6937 धावा (श्रीलंका)
रॉबिन उथप्पा – 6861 धावा ( भारत)
एमएस धोनी – 6858 धावा ( भारत)

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी दिग्गजाने निवडला भारतीय संघ, फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूवर लावला मोठा डाव

फिट अँड फाईन… जिममध्ये घाम गाळत ‘जड्डू’ इंग्लंड दौरा गाजवण्यास होतोय सज्ज; बघा सरावाचा व्हिडिओ

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये ‘हा’ असावा रोहितचा सलामी जोडीदार, चाहत्यांच्या मागणीने धरला जोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---