तिरुअनंतपुरम।भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उद्या होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात एमएस धोनीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे. ४ नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात धोनीने ४९ धावा केल्या होत्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
धोनी हा त्याच्या फिनिशरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु काही दिवसांपासून त्याला ही भूमिका हवी तशी पार पडता आलेली नाही. न्यूझीलंड विरुद्धच्या ४ नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात धोनी जेव्हा मैदानात उताराला तेव्हा विराटबरोबर आक्रमक खेळाची गरज होती मात्र धोनीला ती आक्रमकता दाखवता येत नसल्याने संघावरील दबाव वाढत होता.
या सामन्यात धोनीने अखेरच्या काही षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी केली. त्याने ३७ चेंडूत ४९ धावा केल्या परंतु तोपर्यंत सामना हातातून निसटून गेला होता. त्यामुळे उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यात त्याच्या खेळावर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की धोनी अजूनही वनडे क्रिकेटसाठी त्याचे योगदान देऊ शकतो परंतु टी २० प्रकारासाठी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची गरज आहे.
त्यात काही दिवसांपासून त्याच्या फलंदाजीचा क्रम सतत बदलत आहे. तो कधी चौथ्या कधी पाचव्या तर कधी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो.न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी २० सामन्यात त्याच्या आधी अष्टपैलू हार्दिक पंड्याला पाठवण्यात आले होते. परंतु त्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला नाही.
या आधीही हार्दिकच्या फलंदाजी क्रमवारीत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले जात होते परंतु तो तिथे अपयशी ठरत आहे. अनेकांचे म्हणणे आहे की धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळवावे जेणेकरून त्याला योग्य वेळ मिळेल आणि तो त्याच्या खेळाला योग्य न्याय देऊ शकेल. त्यामुळेच उद्या हार्दिक आणि धोनी कोणत्या क्रमांकावर खेळायला येतात यावर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
३ सामन्यांच्या ती२० मालिकेत १-१ अशी बरोबर झाली आहे. त्यामुळे उद्या होणार तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना हा निर्णायक सामना आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो ही मालिकाही जिंकेल.