फुटबॉल विश्वचषकाला फक्त एक आठवडा राहीला असताना तामिळ, बंगाली, हिंदी आणि मल्याळम भाषिक फुटबॉल चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आहे. रशियात होत असलेल्या या फुटबॉल स्पर्धेचे समालोचन या प्रदेशिक भाषांमधून होणार आहे.
भारतात फिफा विश्वचषकाचे प्रसारण सोनी ईएसपीएन या वाहिनीवरून होणार आहे. भारतासारख्या देशात यामधून फुटबॉल खेळाचा प्रसार होण्यास नक्कीच मदत होणार आहे. ईएसपीन वाहिनीचे हे पाउल नक्कीच कौतुकास्पद आहे.
भारतासारख्या विविध भाषिक देशात यापूर्वी फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत समालोचन व्हायचे. त्यामुळे प्रादेशिक भाषिक प्रेक्षकांना खेळाचा पुरेपुर आनंद लुटता येत नव्हता. मात्र गेल्या काही काळात आयपीयल सारख्या स्पर्धांचे प्रादेशिक भाषांमधून समालोचन होऊ लागल्याने क्रीडा स्पर्धांचा प्रेक्षक वर्ग वाढला आहे.
याच पार्शभूमीवर सोनी ईएसपीएन वाहिनीने तामिळ, बंगाली, हिंदी आणि मल्याळम या भाषांमध्ये फिफा विश्वचकाषचे सामने प्रसारीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र असे असले तरी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात जिथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषीक प्रेक्षक असतानाही या विश्वचषकाच्या सामन्यांचे मराठी भाषेत प्रेक्षपण होणार नाही.
यापूर्वीही आयपीएलचा अंतिम सामना वगळता संपूर्ण आयपीएल आणि प्रो- कबड्डी लीग या स्पर्धांचे प्रसारणही मराठी भाषेला डावलून या तामिळ, बंगाली, हिंदी आणि मल्याळम भाषांमधून झाले होते.