---Advertisement---

धोनीच्या कामगिरीवर चिमुकल्यांची नाराजी, पाहा ट्रोलिंगचा व्हिडीओ

On: रविवार, एप्रिल 13, 2025 4:07 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाची परिस्थिती खूप खराब आहे. चेन्नईने स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले आहेत. त्यामध्ये संघाने फक्त एका सामन्यात विजय मिळवून बाकीच्या चार सामन्यात पराभव पत्करलेला आहे. तसेच चेन्नईने घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकच्या मैदानावर 3 सामने गमावले आहेत.

त्यामध्येच चेन्नईला दुसरा झटका बसला. ते म्हणजे संघाचा कर्णधार स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर पडला. त्याला कोपऱ्याला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यानंतर चेन्नईचे नेतृत्व पुन्हा चाहत्यांचा लाडका थाला म्हणजेच महेंद्र सिंग धोनी करत आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली मागच्या सामन्यात चेन्नईची फारच खराब अवस्था झालेली दिसून आली. केकेआर विरुद्ध मागच्या सामन्यात चेन्नई संघ अवघ्या 104 धावांवर ऑल आउट झाला. कोणत्याही फलंदाजाने प्रभावी कामगिरी केली नाही.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर फक्त अवघ्या 1 धावा करून बाद झाला. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चाहते संताप व्यक्त करत आहेत. चिमुकल्यांनी धोनीवर त्यांचा रोष व्यक्त केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ-

अश्या परिस्थातीत चेन्नई मैदानात पुनरागमन करेल का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.चेन्नई संघाचा पुढचा सामना 14 एप्रिल सोमवार रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---