---Advertisement---

फिफा विश्वचषक: यजमान रशिया स्पर्धेबाहेर, क्रोएशियाने केला २-१ असा पराभव

On: रविवार, जुलै 8, 2018 12:23 PM
---Advertisement---

शनिवारी (७ जुलै) फिफा विश्वचषकाच्या शेवटच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने यजमान रशियाचा २-१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

पहिल्या हाफमध्ये काही काळ पिछाडीवर पडलेल्या क्रोएशियाने ३९ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली.

रशियाच्या  चेरीशेवने पहिल्या हाफमध्ये ३१ व्या मिनिटाला गोल करत रशियाला आघाडी मिळवून दिली होती.

मात्र ही आघाडी रशियाला जास्त वेळ टिकवून ठेवता आली नाही.

पहिल्या हाफच्या ३९ व्या मिनिटाला लगेचच क्रोएशियाच्या आंद्रे कॅमरिचने गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

पहिल्या हाफमध्ये बरोबरीत सुटलेला हा सामना दुसऱ्या हाफमध्येही रंगतदार झाला मात्र यामध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

९० मिनिटाच्या पूर्णवेळ खेळात हा सामना १-१ असा बरोबररीत सुटला होता.

त्यानंतर झालेल्या तीस मिनिटाच्या अतिरिक्त खेळात १०१ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या  वेद्रन कोलुर्काने गोल करत २-१ अशी आघाडी घेतली.

या पराभवा बरोबरच यजमान रशियाचे फिफा विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

उपांत्य फेरीत आता क्रोएशियाला तुफान फॉर्ममध्ये असलेल्या इंग्लंडशी मंगळवारी (१० जुलै) सामना करावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा

-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment