फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. चित्रपटसुष्टीतील कलाकारांपासून ते गल्लीत राहणाऱ्या लहान मुलांपर्यंत प्रत्येकाला फुटबॉलचे वेड आहे. एवढेच नव्हे, तर क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनाही फुटबॉल या खेळाची आवड आहे. यात बीसीसीआय अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली याचाही समावेश आहे.
सौरव गांगुलीलाही फुटबॉलची आवड आहे. गांगुली अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे मोठे चाहते होते. केवळ त्यांच्यामुळेच गांगुली यांनी फुटबॉल पाहण्यास सुरुवात केली. मात्र, या फुटबॉलपटूचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे गांगुलीने भावुक होऊन ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
गांगुली यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मॅराडोना यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने लिहिले की, “माझा हिरो या जगातून निघून गेला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तुझ्यामुळेच मी फुटबॉल पाहायचो.”
My hero no more ..my mad genius rest in peace ..I watched football for you.. pic.twitter.com/JhqFffD2vr
— Sourav Ganguly (@SGanguly99) November 25, 2020
माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने मॅराडोना यांच्या निधनानंतर ट्विट केले. सचिनने लिहिले की, “फुटबॉलने आणि क्रीडाविश्वाने एक महान खेळाडू गमावला आहे. मॅराडोना यांच्या आत्म्याला शांती लाभो. तुमची नेहमीच आठवण येईल.”
Football and the world of sports has lost one of its greatest players today.
Rest in Peace Diego Maradona!
You shall be missed. pic.twitter.com/QxhuROZ5a5— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 25, 2020
माजी भारतीय गोलंदाज इरफान पठाणने लिहिले की, “लहानपणी मला फुटबॉलबद्दल जास्त माहिती नव्हती, परंतु मॅराडोना कोण आहे हे मला ठाऊक होते. मॅराडोना यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
खेळाडूंव्यतिरिक्त आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरच्या माध्यमातून मॅराडोना यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Diego Armando Maradona. RIP Legend. 💙🤍 pic.twitter.com/ZtIlLElBN6
— Mumbai Indians (@mipaltan) November 25, 2020
मॅराडोना यांनी आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. अर्जेंटिनाकडून खेळताना त्यांनी 91 सामन्यांत 34 गोल केले होते. सन 1986 मध्ये मॅराडोना यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकवून दिला होता.
इंग्लंडविरुद्ध मॅराडोना यांनी केलेला गोल ‘हँड ऑफ गॉड’ म्हणून लोकप्रिय आहे. त्यांनी आपल्या वरिष्ठ क्लब कारकिर्दीत एकूण 259 गोल केले आहेत. नापोली, बार्सिलोना, सेविला या मोठ्या क्लबचा ते भाग होते.
वाचा-
आयएसएल २०२०: अनेक डर्बींंचे साक्षीदार ठरलेले रॉबी फाऊलर आता कोलकाता डर्बीसाठी सज्ज
“दिएगो मॅराडोना फुटबॉलचे उस्ताद”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्याबद्दलच्या १२ रंजक गोष्टी, वाचा