पोर्तुगाल संघाचा दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला अमेरिकेतील एका न्यायालयाने दिलासा दिला आहे. रोनाल्डोवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला गेला होता. हा आरोप अमेरिकेतील एक राज्य नेवादाची राहणारी कॅथरीने मायोग्राने २००९ साली केला होता. आरोपांसह या महिलेने तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी रोनाल्डोकडे मोठी नुकसान भरपाई देखील मागितली होती, पण या सर्व प्रकारातून आता रोनाल्डो निर्दोश सुटला आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) लोकप्रिय फुटबॉल क्लब मॅनचेस्टर युनायटेडसाठी खेळतो, पण त्याचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आहे. रोनाल्ड आणि कॅथरीन मायोग्रा (Kathryn Mayorga) यांचे प्रकरण २००९ साली चांगलेच गाजले होते. मायोग्राने दावा केला होता की, रोनाल्डोने लास वेगलच्या एका हॉटेलमध्ये तिच्यावर हल्ला केला होता आणि त्याच वेळी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील केला. याच कारणास्तव मायोग्राने न्यायालयात त्याच्याकडून ३ लाख ७५ हजार अमेरिकी डॉलर्सची नुकसान भरपाई देखील मागितली होती.
अमेरिकेतील एका न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. न्यायालयाने ४२ पाणी निर्णयात रोनाल्डोला सर्व आरोपांमधून मुक्त केले आहे. निर्णयात सांगितले गेले आहे की, आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलांनी या खटल्यासाठी योग्य प्रक्रिया वापरली नाही. याच कारणास्तव या खटल्याचा निकाल जाहीर करता येणार नाही.
दरम्यान, रोनाल्डो सध्या एक महागडा आणि फिटनेसच्या बाबतीत एक सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सध्या त्याला सोशल मीडियावर इतर कोणत्याही खेळाडूच्या तुलनेत सर्वात जास्त फॉलोवर्स आहेत. तसेच त्याची वार्षिक उलाढाल देखील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा जास्त आहे.
फुटबॉलमध्ये त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे, ज्यातील अनेक विक्रम हे अबाधित आहेत. त्याच्याकडे पाच वेळा फुटबॉलमधील मानाचा पुरस्कार बॅलन डी ओर नावावर केला आहे. तसेच, त्याने युरोपिय गोल्ड शूज चार वेळा जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू देखील रोनाल्डोच आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशियाई चषकाच्या क्वालिफायरमध्ये भारताची अफगाणिस्तानवर मात; छेत्री, समदचे महत्त्वपूर्ण गोल्स
अभिमानास्पद! भारताने रचला इतिहास, पहिल्यांदाच फिफे नेशन्स कपसाठी ठरला पात्र
भारती एफसी, एएफए सॅमफोर्ड, पुणेरी वॉरियर्स, नॉइझी बॉईज उपांत्य फेरीत