अफगानिस्तान सध्या भयानक परिस्थितीचा सामना करत आहे. तालिबानने संपूर्ण अफगानिस्तानावर ताबा मिळवला आहे. इतर क्षेत्रांसह क्रिडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. दरम्यान अफगानिस्तानच्या राष्ट्रीय संघाचा फुटबॉलपटू झाकी अनवारी याचा मृत्यू झाला आहे.
अफगानिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यामुळे सामान्य जनतेचा थरकाप उडाला आहे. प्रत्येक जन आपला जीव वाचवून पळ काढण्याच्या प्रयत्नात आहे. अनेकांनी तर जीव धोक्यात घालून विमानाच्या वर बसून सुरक्षित स्थानी जाण्याचा प्रयत्न देखील केला आहे. हीच चूक अफगानिस्तानचा फुटबॉलपटू झाकी अनवारीने देखील केली होती.
सोमवारी (१६ ऑगस्ट) झाकी अनवारी याचा काबूल विमानतळावर अमेरिकेच्या लष्करी विमानावरून पडून मृत्यु झाला आहे. अफगाणिस्तानची वृत्तसंस्था एरियानाने गुरुवारी (१९ ऑगस्ट) म्हटले की, “रविवारी (१५ ऑगस्ट) तालिबानी बंडखोर सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तानातून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गर्दी विमानतळावर जमली आहे. अनेकांनी चालत्या विमानात चढण्याचा देखील प्रयत्न केला होता. झाकी अनवारी यूएसएएफ विमानातून पडला होता, ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. ”
तालिबानने अफगानिस्तानचा संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. इस्लामिक अमीरातच्या नावाने सरकार बनवणारे तालिबान अफगानिस्तानात शरिया कायदा लागू करणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीची ‘विराट’ दूरदृष्टी! २०१५ मध्येच केला होता भारताला सर्वोत्कृष्ट कसोटी संघ बनवण्याचा संकल्प
नुसता धुरळा! २३ षटकारांसह चोपल्या ३०२ धावा, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज फॉर्मात