---Advertisement---

नुसता धुरळा! २३ षटकारांसह चोपल्या ३०२ धावा, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज फॉर्मात

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 11:11 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये सध्या ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात इंग्लंड संघातील खेळाडू संघर्ष करताना दिसून येत आहेत. परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उलट चित्र पाहायला मिळते आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज लियाम लिविंगस्टोन तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे.

इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज लियाम लिविंगस्टोनने सध्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत तुफान फटकेबाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. लियाम लिविंगस्टोन या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने या स्पर्धेत चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने बर्मिंघम फिनिक्स संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले आहे.

लियाम लिविंगस्टोनने सध्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६०.४० च्या सरासरीने ३०२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३ अर्धशतक देखील झळकावले आहेत. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत १८ चौकार आणि २३ षटकार मारले आहेत. षटकार मारण्याच्या बाबतीत तो सर्वात पुढे आहे. तसेच लियाम लिविंगस्टोननंतर ग्लेन फिलिप्स आणि मोईन अली हे दोघे आहेत. दोघांनी आतापर्यंत १२-१२ षटकार मारले आहेत.(Liam Livingstone smashed 23 sixes and scored 302 runs in the hundred cricket league)

लीड्समध्ये लिविंगस्टोनचा जलवा
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये पार पडणार आहे. याच मैदानावर लिविंगस्टोनने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. नॉदर्न सुपरचार्जर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लिविंगस्टोनने अवघ्या ४० चेंडूत ९२ धावांची तुफान खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार तर १० गगनचुंबी षटकार मारले होते. तर रॉकेटस संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३१ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली होती. अशीच कामगिरी त्याने यूएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत सुरू ठेवली तर इंग्लंड संघ विश्वविजेता बनेल यात काहीच शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल

आयसीसीची मोठी घोषणा; महिला विश्वचषक २०२२ च्या क्वालिफायरचे ‘हा’ देश भूषवेल यजमानपद

ऐकलंत का! गंभीर म्हणतोय, “भारत पाकिस्तानपेक्षा मजबूत, पण अफगानिस्तानपासून आहे धोका”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---