येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही मोठी स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघ्या २ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यासाठी सर्वच संघांनी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यांच्या संघाची घोषणा केली होती. आता ऑस्ट्रेलियाने देखील १५ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.
या संघात यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसचे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण जोश इंग्लिसने ऑस्ट्रेलिया संघासाठी आतापर्यंत एकही सामना खेळला नाही. तो या संघातील एकमेव नवखा खेळाडू आहे, ज्याची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निवड करण्यात आली आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी जोश इंग्लिसची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाल्यानंतर, मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी म्हटले की, “जोश वर आमचा बऱ्याच काळापासून डोळा होता. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मुख्यतः वायटेलिटी ब्लास्ट स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यामुळेच त्याला ही संधी देण्यात आली आहे.”
टी-२० ब्लास्ट स्पर्धेत झळकावले २ शतक
इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट संघातील लीसेस्टरशर संघाचे प्रतिनिधित्व करताना जोशने १७५ पेक्षा ही अधिकच्या स्ट्राइक रेटने ५३१ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने तुफान फटकेबाजी करत २ शतक आणि १ अर्धशतक झळकावले होते. तसेच त्याने २४ षटकार मारले होते.
जोशने बिग बॅश, टी-२० ब्लास्ट आणि द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत तुफान फटकेबाजी केली आहे. ज्यामुळे त्याला टी-२० विश्र्वचषक स्पर्धेत अनुभवी ॲलेक्स कॅरीऐवजी संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेत तो तुफान फटकेबाजी करताना दिसून आला तर क्रिकेट चाहत्यांना याचे आश्चर्य वाटणार नाही.(Uncapped wicketkeeper josh Inglis selected in 15 member austrelia squad)
जोश इंग्लिसचा जन्म ४ मार्च १९९५ रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी तो ऑस्ट्रेलियामध्ये आला होता. बिग बॅश लीग स्पर्धेत जेव्हा जोशने अफगाणिस्तान संघाचा अनुभवी गोलंदाज राशिद खानचे ६ चेंडू खेळले होते. त्यावेळी रिकी पाँटिंगने भविष्यावाणी केली होती की, जोश हा एक दिवस नक्की ऑस्ट्रेलिया संघासाठी खेळणार. परंतु तो आता ऑस्ट्रेलिया संघासाठी एकही सामना न खेळता, थेट टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नुसता धुरळा! २३ षटकारांसह चोपल्या ३०२ धावा, टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज फॉर्मात
तयारी आयपीएल ट्रॉफी पटकावण्याची! क्वारंटाईन संपवून सीएसकेची सरावास सुरुवात, फोटो व्हायरल
आयसीसीची मोठी घोषणा; महिला विश्वचषक २०२२ च्या क्वालिफायरचे ‘हा’ देश भूषवेल यजमानपद