---Advertisement---

विराट कोहलीच्या १२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ही नकोशी गोष्ट

---Advertisement---

ऑकलँड। आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 273 धावा केल्या आहेत आणि भारताला 274 धावांचे आव्हान दिले आहे.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार विराट कोहली 25 चेंडूत 15 धावा करुन बाद झाला. त्याला टीम साऊथीने 10 व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्यामुळे कोहलीच्या वनडे कारकिर्दीत असे पहिल्यांदाच घडले की तो सलग 3 वनडे डावात त्रिफळाचीत झाला आहे.

याआधी 5 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याला इश सोधीने 51 धावांवर त्रिफळाचीत केले होते. तर त्याआधी बंगळुरु येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट 89 धावांवर असताना जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता.

आज न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात 274 धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी गडगडली आहे. भारताच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या आहेत. भारताने 31.1 षटकात 153 धावांवर 7 विकेट्स गमावल्या आहेत. भारताकडून आत्तापर्यंत केवळ श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी करत एकाकी झूंज दिली, मात्र तोही 52 धावांवर झेलबाद झाला.

तत्पूर्वी न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने 79 धावांची तर रॉस टेलरने नाबाद 73 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच हेन्री निकोल्सने 41 धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला 273 धावा करता आल्या. भारताकडून गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---