---Advertisement---

ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात

On: गुरूवार, नोव्हेंबर 1, 2018 6:02 PM
---Advertisement---

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे.

या सामन्यात एमएस धोनी आणि भुवनेश्वर कुमारला खास विक्रम करण्याची संधी होती. परंतु आज त्यांची ही संधी हुकली. त्यामुळे त्यांना आता पुढच्या वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

भारताकडून वनडेत १० हजार धावा करण्याची धोनीला होती संधी- 

धोनीने वनडेत भारताकडून ९९९९ धावा केल्या आहेत. मुंबईतील सामन्यात त्याला ही संधी होती. परंतु तो हा कारनामा करु शकला नाही. त्यामुळे त्याला आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावी लागणार आहे. धोनी आजपर्यंत वनडेत भारताकडून ३२९ तर एशिया ११ कडून ३ सामने खेळला आहे.

भुवीची संधीही हुकली- 

भारताकडून भुवनेश्वर कुमार ९५ सामने खेळला असुन त्यात त्याने ९९ विकेट्स घेतल्या आहेत. जवळपास सामन्यामागे त्याने केवळ एक विकेट वनडेत घेतली आहे. आज त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ११ धावा देत १ विकेट घेतली. त्यामुळे त्यालाही हा पराक्रम करण्यासाठी पुढील वर्षापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

पुढील वनडे सामना थेट १२ जानेवारीला- 

भारतीय संघ यावर्षी मायदेशात आता केवळ ३ टी२० सामने खेळणार आहे. हे सामने विंडीजविरुद्ध कोलकाता (४ नोव्हेंबर), लखनऊ(६ नोव्हेंबर) आणि चेन्नई ( ११नोव्हेंबर) येथे होणार आहे.

त्यानंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार असुन यात पहिल्यांदा ३ सामन्यांची टी२०, नंतर ४ सामन्यांची कसोटी आणि शेवटी ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना १२ जानेवारी रोजी खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हिटमॅन रोहित शर्माचा वन-डेत धमाका, केला असा काही कारनामा जो कुणालाही जमला नाही

बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment