---Advertisement---

२०-३०-४०-५०, काय आहे हा आजच्या सामन्यातील आकड्यांचा खेळ

On: शुक्रवार, फेब्रुवारी 8, 2019 6:05 PM
---Advertisement---

ऑकलंड | भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ७ विकेट्स आणि ७ चेंडू राखून शानदार विजय मिळवला. याचबरोबर भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

या सामन्यात कृणाल पंड्याला उत्कृष्ठ गोलंदाजीबद्दल सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याच सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्माने  सर्वाधिक ५० धावांची खेळी केली.

भारताने हा सामना ७ विकेट्स जिंकला परंतु मैदानावर जे ५ खेळाडू आले त्यातील रोहित शर्माने ५०, रिषभ पंतने नाबाद ४०, शिखर धवनने ३० तर एमएस धोनीने नाबाद २० धावा केल्या. विजय शंकरने १४ तर अतिरिक्त ८ अशा संघाने एकूण १६२ धावा केल्या.

यामुळे २०-३०-४०-५० असा एक मजेशीर आकडा आजच्या सामन्यात पहायला मिळाला.

भारतीय संघ ३ सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी खेळणार आहे.

महत्त्वाची बातमी-

या ५ विक्रमांमुळे रोहित शर्माच आहे टी२०मध्ये विराटपेक्षा मोठा खेळाडू

तब्बल २०० सामने कमी खेळूनही रोहित धोनीला सरस

जी वेळ रोहित शर्माच्या टीम इंडियावर आली ती कधीही विराटच्या संघावर आली नव्हती

ना धोनी, ना विराट; रोहित शर्मा कर्णधार म्हणून सर्वांना सरस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment