इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खान याला अखेर कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. सरफराज खान याने भारता पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात अर्धसतकी खेळी केली. या प्रदर्शनानंतर सरफराजची खास प्रतिक्रिया समोर येत आहे. मागच्या काही रणजी हंगामांमध्ये असाधारन खेळी केल्यानंतर अखेर गुरुवारी (15 फेब्रुवारी) त्या कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारतीय संघापर्यंतचा त्याचा प्रवास नक्कीच वडिलांमुळे शक्य झाला.
सरफराज खान याचे वडील नौशाद खान (Naushad Khan) मुलाच्या कसोटी पदार्पणासाठी गुरुवारी राजकोट स्टेडियममध्ये उपस्थित होते. सोबत सरफराजची बायको देखील होती. सरफराज खान (Sarfaraz Khan) याला एक उत्तम फलंदाज बनवण्यामागे नौशाद यांचे कठोर परिश्रम राहिले आहेत. त्यांनी स्वतः आपल्या दोन्ही मुलांकडून क्रिकेटचा सराव करून घेतला आहे. भारताचे माजी दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्याकडून सरफराजला कसोटी पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर नौशाद यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
Sarfaraz Hugging his father after getting the India cap. ❤️
– The moment of the series. pic.twitter.com/dcAnwx1zU3
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2024
Sarfaraz Khan’s father kissing the Test cap of his son. ⭐
– Emotions at Rajkot. pic.twitter.com/ozhkxDmPvF
— Johns. (@CricCrazyJohns) February 15, 2024
गुरुवारी अर्धशतकी खेळी केल्यानंतर पदार्पणवीर सरफराज खान म्हणाला, “मैदानात आल्यानंतर मला खूप बरे वाटले. मी 6 वर्षांचा होतो तेव्हापासून क्रिकेट खेळत आहे. माझ्या वडिलांचे क्रिकेटवर प्रेम होते. मी भारताकडून क्रिकेट खेळावं ही त्यांची इच्छा आणि त्यांच्यासाठी माझे स्वप्न होते. मी आणि माझ्या भावाच्या क्रिकेटसाठी वडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. हा (कसोटी पदार्पण) माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षण आहे.”
दरम्यान, राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर भारताची धावसंख्या 5 बाद 326 धावा आहे. रोहित शर्मा याने 196 चेंडूत 131 धावा केल्या. 212 चेंडूत 110 धावा केल्या. तर सरफारजने कसोटी क्रिकेटमधील पहिल्या डावात 66 चेंडूत 62 धावा केल्या. मार्क वुड याने इंग्लंडसाठी 17 षटकात 69 धावा खर्च करत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. (‘For me and my brother…’, what Sarfraz said after scoring a half-century on Test debut)
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग ईलेव्हन – बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.
महत्वाच्या बातम्या –
वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक
वेलकम टू टीम इंडिया! पदार्पणाच्या सामन्यात सरफराजचे अर्धशतक, वडील आणि पत्नी भावूक