---Advertisement---

‘या’ कारणामुळे ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले तब्बल १६.२५ कोटी

On: शनिवार, फेब्रुवारी 27, 2021 11:50 PM
---Advertisement---

चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय संघांनी घेतलेले दिसले. तसेच अनेक परदेशी खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागली. यातही ख्रिस मॉरिसला लागलेल्या बोलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याला लिलावात मिळालेल्या किमतीने इतिहास घडवला.

मॉरिसला राजस्थान रॉयल्सने लिलावात तब्बल १६.२५ कोटी रुपये मोजत खरेदी केले. त्यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरला. आत्तापर्यंत कोणालाही एवढी किंमत मिळाली नव्हती. याआधी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्याला २०१५ साली दिल्ली फ्रँचायझीने १६ कोटी रुपयांना खरेदी केले होते.

…म्हणून मॉरिसला १६ कोटींपेक्षा मोजली अधिक किंमत

मॉरिससाठी इतकी जास्त किंमत काय मोजली याबद्दल आता राजस्थान रॉयल्सच्या सीओओने माहिती दिली आहे. राजस्थानचे सीओओ जॅक लश मॅक्रम यांनी सांगितले की मॉरिसवर नेहमीच संघाचे लक्ष होते.

ते टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, ‘ख्रिस मॉरिसवर आमचे नेहमीच लक्ष होते आणि आम्हाला माहित होते की त्याला संघात घेण्यासाठी संघांमध्ये चुरस असणार आहे. बरं झालं लिलावावेळी १६.२५ कोटींची आम्ही बोली लावल्यानंतर पुढे पंजाब किंग्सने बोली लावली नाही. नाहीतर आम्हाला कदाचीत त्याला गमवावे लागले असते.’

तसेच मॅक्रम पुढे म्हणाले, ‘ख्रिसकडे अनोखी क्षमता आहे आणि आम्हाला त्याच्या खेळण्याबद्दल उत्सुकता आहे. तो अनुभवी आहे आणि गोलंदाजीला खोली देईल. विशेषत: जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागीसह तो गोलंदाजी करेल. तसेच तळातल्या फळीत आक्रमक फलंदाजी करुन तो आम्हाला सामने जिंकवूनही देऊ शकतो.’

मॉरिस आयपीएल २०२० च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला होता. पण त्यांनी त्याला १४ व्या मोसमाच्या लिलावापूर्वी मुक्त केले होते.

आयपीएल कारकिर्द

३३ वर्षीय ख्रिस मॉरिसने २०१३पासून आयपीएलचे तब्बल ७० सामने खेळले असून त्यात त्याने २३.९६च्या सरासरीने ५५१ धावा व ८० विकेट्स घेतल्या आहेत. १५७च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केलेल्या या खेळाडूने २३.९९च्या चांगल्या सरासरीने विकेट्सही घेतल्य़ा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

खुशखबर ! इंग्लंड विरुद्धची वनडे मालिका पुण्यातच होणार, मात्र…

विसरभोळा आफ्रिदी ! ‘हा’ महत्त्वाचा नियम विसरला अन् आयसीसीलाच केले टार्गेट

‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, या कर्णधाराने फुंकले रणशिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---