---Advertisement---

पुणेकर क्रिकेटप्रेमींसाठी आहे ‘ही’ बॅड न्यूज! प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहाता येणार नाहीत वनडे सामने

On: रविवार, फेब्रुवारी 28, 2021 8:10 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंडचा संघ लांबलचक दौऱ्यासाठी भारतात आला आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांनंतर २-१ अशा फरकाने सध्या मालिकेत भारताचे पारडे जड झालेले दिसून येते. कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथेच खेळली जाईल. त्यानंतर होणाऱ्या तीन सामन्यांची वनडे मालिका पुणे येथे खेळणे निश्चित झाले होते. मात्र, पुण्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने या मालिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता, या वनडे मालिकेविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

सामने पुण्यातच होणार मात्र..
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानची तीन वनडे सामन्यांची मालिका महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमवर खेळविणे ठरले होते. मात्र, काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने हे सामने इतरत्र खेळण्याविषयी हालचाली सुरू झाल्या होत्या. या सर्व हालचाल इन दरम्यान आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

एका अग्रगण्य क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही वनडे मालिका पुणे येथे खेळण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या मालिकेसाठी प्रेक्षकांना मैदानात येण्यास परवानगी नसेल. सर्व सामने हे विनाप्रेक्षक बंद दरवाजाआड खेळले जातील. पुण्यामध्ये गुरुवारी (२५ फेब्रुवारी) १,५४२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.

असा आहे इंग्लंडच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २३ मार्च रोजी होणार आहे. दुसरा सामना २६ मार्च आणि तिसरा सामना २८ मार्च रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने प्रकाशझोतात खेळवले जातील.

वनडे मालिकेपूर्वी दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची टी२० मालिका अहमदाबाद येथे होणार आहे. पहिला टी२० सामना १२ मार्च रोजी होईल. दुसरा सामना १४ मार्च रोजी, तिसरा सामना १६ मार्च, चौथा सामना १८ मार्च आणि शेवटचा टी२० सामना २० मार्च रोजी होईल.

कसोटी मालिकेत भारताने घेतली आहे आघाडी
सध्या उभय संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पाहुण्या इंग्लंड संघाने चेन्नई येथील पहिल्या कसोटीत विजय मिळवून दौऱ्याची दमदार सुरुवात केली होती. मात्र, चेन्नई येथीलच दुसरा सामना जिंकत भारतीय संघाने पुनरागमन केले. अहमदाबाद येथील दिवस-रात्र कसोटी अवघ्या दोन दिवसांत जिंकत भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे आगेकूच केली. मालिकेतील अखेरचा सामना ४ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (पूर्वाश्रमीचे मोटेरा स्टेडियम) खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या –

विसरभोळा आफ्रिदी ! ‘हा’ महत्त्वाचा नियम विसरला अन् आयसीसीलाच केले टार्गेट

‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, या कर्णधाराने फुंकले रणशिंग

चौथ्या सामन्यात होणार धावांची लयलूट? खुद्द बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खेळपट्टीबद्दल खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---