पुणे: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो2000पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत ग्रँडमास्टर दर्जाच्या परदेशी खेळाडूंनी विजयाची नोंद करताना चमकदार कामगिरीसह आजचा
सातव्या फेरीतील महत्वपूर्ण लढतीत जॉर्जियाच्या द्वितीय मानांकित ग्रँडमास्टर लुका लुका पैचाझला ग्रँडमास्टर निकितेंको मिहेलकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तसेच सहाव्या फेरीत बरोबरीत समाधान मानावे लागलेल्या ताजिकिस्थानच्या अग्रमानांकित ग्रँडमास्टर आमोनातोव्ह फारुखने एल आर श्रीहरीचा पराभव करत विजयी पुनरागमन केले. आमोनातोव्ह फारुखने या लढतीच्या अखेरीस अप्रतिम फिनिशिंगचे दर्शन घडवले. या विजयामुळे निकितेंको आणि फारुखयांनी प्रत्येकी सहा गुणांची कमाई करताना एकूण १४२ खेळाडूंमध्ये संयुक्त अग्रस्थान पटकावले. एकूण ११ फेऱ्यांची हि स्पर्धा स्विस लीग पाद्धतीने खेळली जात आहे. सावचेन्को बोरिस, दीपसेन गुप्ता, अर्जुन कल्याण, आदित्य मित्तल, स्तूपक किरील व गुयेन व्हॅन व्हुय हे पाच खेळाडू प्रत्येकी ५.५ गुणांसह संयुक्त दुसर्या क्रमांकावर असून अन्य ११ खेळाडू प्रत्येकी ५गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
महिला खेळाडू दिव्या देशमुखला स्क्वाच बचावाच्या लढतीत मिरझोव्हविरद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. दिव्याने राजाच्या बाजूने जोरदार आक्रमण करीत मिरझोव्हवर दडपण आणले. परंतु मिरझोव्हने उत्कृष्ट बचाव करीत लढत बरोबरीत सोडवली. माझ्याकडून महत्वाच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे विजयाची संधी हुकली, अशी कबुली दिव्या देशमुखने दिली. आतापर्यन्त चमकदार कामगिरी करणाऱ्या भक्ती कुलकर्णीला स्तूपक किरीलविरुद्ध पराभव पत्करावा लागला. निमजो इंडियन बचावाच्या या लढतीत भक्तीने तीन प्याद्यांच्या बदल्यात महत्वाचे मोहरे गमावले व नंतर तिचा वजीरही कोंडीत सापडला. भक्तीने ४७व्या चालीत शरणागती पत्करली.
निकाल: सातवी फेरी: (व्हाईट व ब्लॅक या नुसार):
जीएम अमोनाटोव्ह फारुख(तझाकिस्तान) (२६२२) (६ गुण) वि.वि आयएम श्रीहरी एल आर(भारत) (२४०४)(५ गुण)
जीएम निकितेंको मिहेल(बेलारूस)(२४७९)(६गुण) वि.वि जीएम पायचाडझे लुका(जॉर्जिया)(२५६७)(५ गुण)
जीएम दिप सेनगुप्ता(भारत) (२५२६)(५.५गुण) बरोबरी वि जीएम सावचेन्को बोरिस(रशिया) (२५२४)(५.५गुण)
जीएम अर्जुन कल्याण(भारत)(२४७७)(५.५गुण) वि.वि अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज(बेलारूस)(२४९२)(५गुण)
जीएम ललीथ बाबू एम.आर(भारत)(२५६३)(५गुण) बरोबरी वि जीएम गुयेन व्हॅन व्हुय(व्हिएतनाम)(२४०५)(५गुण)
आएम आदित्य मित्तल(भारत)(२४९०)(५.५गुण) वि.वि उत्सब चॉटर्जी(भारत)(२४०३)(४.५गुण)
कौस्तुव कुंडू(भारत)(२३२७)(५गुण) बरोबरी वि जीएम कार्तिक वेंकटरमण(भारत)(२४८०)(५गुण)
जीएम स्तुपक किरील(२४४०)(५.५गुण) वि.वि आयएम भक्ती कुलकर्णी(भारत) (२३७०)(४.५गुण)
जीएम गुयेन ड्यूक होआ(बेलारूस)(२३९७)(५.५गुण) वि.वि जीएम विष्णु प्रसन्न व्हि(भारत)(२४३७)(४.५गुण)
एफएम वेदांत पानेसर(भारत)(२३३७)(५गुण) वि.वि जीएम दिपन चक्रवर्ती जे(भारत)(२४७८)(४गुण)
दिव्या देशमुख(भारत)(२७१७)(४.५गुण)बरोबरी वि.मिरझोव्ह अझेर(२४७६)(अझरबैजान ) (४.५गुण)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?