सन 2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा पहिल्या फेरीतच पराभव झाला होता. श्रीलंकाच्या हातून पराभूत झाल्यानंतर राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला दुसर्या फेरीत पोहोचला आले नव्हते. अशात राहुल द्रविडच्या नेतृत्वात संघाकडून बरीच अपेक्षा असताना अवघ्या तीन सामन्यानंतर भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास संपला होता. यानंतर कर्णधार द्रविड संघातील खेळाडूंना एका ठिकाणी घेऊन गेला होता. यासंदर्भात भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने खुलासा केला आहे.
स्टार स्पोर्टसवर विश्वचषक 2007 मधील आठवणी सांगताना इरफान म्हणाला की, “भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर कर्णधार राहुल द्रविडने माझे आणि एमएस धोनीचे मनोबल वाढविण्यासाठी, आम्हाला हिंदी चित्रपट दाखवायला घेऊन गेला होता.”
इरफान पठाण पुढे म्हणाला की, “द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता. तेव्हा देखील तो तरुण खेळाडूंबरोबर अगदी स्पष्टपणाने बोलत होता. जर कोणत्या खेळाडूला काही अडचण आली. तर तो सरळ द्रविडजवळ जात असे आणि आपल्या अडचणीबद्दल एकदम मोकळेपणाने बोलत असायचे.”
“जेव्हा आम्ही 2007 विश्वचषकमधून बाहेर पडलो; तेव्हा द्रविड आमच्याजवळ आला आणि म्हणाला की, हे बघा आपण सर्वजण उदास आहोत. पण चला आपण सर्वजण चित्रपट बघायला जाऊया. जेव्हा आम्ही चित्रपट बघायला गेलो. तेव्हा द्रविड आमच्या दोघांना म्हणाला की, होय आपण विश्वचषक हरलो आहोत. आपल्या सर्वांनाच एक मोठा बदल घडवून आणायचा होता. परंतु हा काही शेवटचा सामना नव्हता,” असेही त्याने पुढे सांगितले.
जीवन खूप मोठे आहे आणि आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया. द्रविड खूप चांगला व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आहे आणि क्रिकेटपटूंना नेहमीच सकारात्मक विचारात ठेवण्याची त्याची इच्छा असते. म्हणून जर कोणी दुर्दैवाने श्रीलंकेत फॉर्ममधून बाहेर पडले. तर त्याला मार्गदर्शन करणारा आणि आत्मविश्वास देणारा तो पहिला व्यक्ती असेल, असे त्याने शेवटी सांगितले.
भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. 13 जुलैपासून उभय संघाच्या दौऱ्याची सुरुवात आहे. या दौऱ्यात त्यांना 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे. या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडची नियुक्ती केली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलावणे म्हणजे इतर खेळाडूंचा अपमान,’ विश्वविजेता कर्णधार संतापला
मी चकित झालोय, दुखापत असूनही शुबमन इंग्लंडला गेलाच कसा? माजी यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न
‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका