---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगत शोक सागरात, माजी कर्णधाराचे झाले निधन

---Advertisement---

ऍडलेड । ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्तुळात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी यष्टीरक्षक आणि आयसीसीचे माजी मॅच रेफरी बॅरी जर्मन यांचे निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. दक्षिण ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने सांगितले, की जर्मन यांचे शनिवारी निधन झाले आहे. त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.

जर्मन (Barry Jarman) यांनी १९५९ साली ऑस्ट्रेलिया (Australia) संघाकडून कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून एकूण १९ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी १४.८१ च्या सरासरीने ४०० धावा केल्या. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी १९१ प्रथम श्रेणी सामने खेळले. त्यात त्यांनी २२.७३ च्या सरासरीने ५६१५ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकांचा समावेश आहे.

भारताविरुद्ध खेळले होते पहिला सामना

१९५९ मध्ये भारत दौऱ्यात जर्मन यांनी ऑस्ट्रेलियाकडून कानपूर येथे कसोटी क्रिकटमध्ये पदार्पण केले. परंतु त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी तब्बल ८ वर्षे वाट पहावी लागली. त्यांनी १९६७- ६८ मध्ये आपली बाजू मजबूत केली तसेच ऍशेस मालिकेत इंग्लंड दौऱ्यावर नियमित कर्णधार बिल लॉरी दुखापतग्रस्त झाल्यामुळे जर्मन यांनी एका सामन्यात प्रभारी कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळली.

रेफरीचीही भूमिका निभावली

खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर ते मॅच रेफरी (Match Referee) म्हणून आयसीसीमध्ये सामील झाले आणि २००१ पर्यंत त्यांनी २५ कसोटी आणि २८ वनडे सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून आपले योगदान दिले. जर्मन यांनी १९९८ साली धोकादायक खेळपट्टीमुळे जमैका येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी सामना एका तासाच्या आत थांबवला होता.

जर्मन ऑस्ट्रेलियाचे ३३ वे कर्णधार होते

जर्मन ऑस्ट्रेलियाचे ३३ वे कसोटी कर्णधार होते, तर कसोटीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणाऱ्या केवळ ५ यष्टीरक्षकांपैकी ते एक होते. १९९७ मध्ये त्यांना दक्षिण ऑस्ट्रेलियामधील खेळातील योगदानासाठी ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..

-अखेर बकनरने कबूल केले; माझ्या त्या दोन चुका भारताला नडल्याच

-बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट कॅपची

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---