ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने विराट कोहलीच्या स्लेजिंगवर मोठे वक्तव्य केले आहे. पेन म्हणतो, विराटला स्लेज न करण्याचा लोकांचा सल्ला ऐकून तो कंटाळला होता. वास्तविक, हे भारताच्या 2018-19 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याचे प्रकरण आहे, जेव्हा कांगारू संघाने विराट कोहलीवर मानसिक ताबा मिळविण्यासाठी स्लेजिंग सुरू केले. त्यादरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेनने विराट कोहलीची जोरदार स्लेजिंग केली होती.
टीम पेन म्हणतो की, ऑस्ट्रेलियाने विराट कोहलीला स्लेज केले की नाही, तरीही तो खूप धावा करत होता. त्याने केवळ विराटचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणाला, “लोक म्हणायचे की विराटला स्लेज करू नका. तुम्ही त्याच्यावर स्लेजिंग करत नसला तरीही तो अजूनही चांगल्या धावा करत आहे. त्यामुळे तुम्ही त्याला स्लेज केले की नाही हे काही फरक पडत नाही.”
टीम पेनने सांगितले की विराट स्लेजिंग न करण्याबद्दल लोकांचे बोलणे ऐकून तो चिडायचा. तो म्हणाला, “मला विराट कोहलीला जास्त चिथावण्याचा प्रयत्नही करायचा नव्हता. आम्ही फक्त त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आशा होती की विचलित झाल्यामुळे तो खराब फटके खेळू शकेल. पण तसे झाले नाही, तो दिवस आठवून मला आजही आश्चर्य वाटते , कारण विराट कोहलीला त्या सामन्याबद करायचे जवळपास अशक्य होते.
2018-2019 दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात विजयाची नोंद करण्यात भारताला यश आले तर दुसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मालिकेचा निर्णय चौथ्या आणि शेवटच्या कसोटीने होणार होता, जी अनिर्णित राहिली. यासह ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत इतिहासातील पहिला आशियाई संघ ठरला होता.
महत्तवाच्या बातम्या-
मोहम्मद शमीचे मैदानात पुनरागमन! या मालिकेतून टीम इंडियासाठी करणार लवकरच कमबॅक
SL Vs Ind: भारताचा पुढचा टी20 कर्णधार म्हणून हार्दिक की सूर्या? लवकरच होणार घोषणा
निवृत्तीनंतर भारताच्या दिग्गज खेळाडूनं आईसाठी शेअर केली एक खास पोस्ट…!