आशिया चषक 2023 स्पर्धेचा थरार सुरू होण्यासाठी अवघ्या 4 दिवसांचा कालावधी उरला आहे. 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणाही झाली आहे. आशिया चषकासाठी निवडल्या गेलेल्या 17 सदस्यीय भारतीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यर या दोन हुकमी एक्क्यांची जोडगोळी परतली आहे. तसेच, दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल यांना संघातून बाहेर काढले आहे. त्यामुळे या भारतीय संघातून विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या 15 सदस्यीय संघाची झलक स्पष्टपणे दिसत आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने आपला 15 सदस्यीय भारतीय संघ निवडला आहे.
हेडनने आपल्या संघात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांना सलामीची जबाबदारी दिली आहे. मधल्या फळीत त्याने ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर यांना संघात निवडले आहे. त्याने आशिया चषकासाठी संधी न मिळालेल्या संजू सॅमसन याला देखील संधी दिली.
त्याने या संघात सध्या फॉर्ममध्ये असलेल्या फिरकीपटू कुलदीप यादव याला संघात स्थान दिले नाही. यासोबतच त्याने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यावर सोपवली आहे.
हेडनने विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
(former Australia Cricketer Matthew Hayden3Picks 15 Indian Team Squad for World Cup 2023 know here)
हेही वाचा-
एशियन गेम्ससाठी ‘हा’ दिग्गज बनला ऋतुराज ब्रिगेडचा गुरु, सुवर्णपदकाचे ठेवले लक्ष्य
Video: आऊट झाल्याच्या रागात फलंदाजाने फेकली बॅट; पुढं जे झालं, ते तुम्हीच पाहा