तो फॉर्ममध्ये परतला! श्रेयसने सराव सामन्यात चोपल्या ‘एवढ्या’ धावा, Asia Cupमध्ये काढणार पाकिस्तानचा घाम

आशिया चषक 2023 स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर याने सराव सामन्यात शानदार प्रदर्शन केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अय्यरने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे 199 धावांची झंझावाती खेळी साकारली आहे. अशात त्याचे पुनरागमन कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचे टेन्शन वाढवू शकते. कारण, भारतीय संघाचा आशिया चषकातील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध आहे.
बीसीसीआयच्या सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अय्यरने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सराव सामन्यात 199 धावा केल्या. त्याने 50 षटके क्षेत्ररक्षणही केले. सराव सामना 3-4 दिवसांपूर्वी झाला होता. तो मागील 2 महिन्यांपासून बंगळुरूमध्येच आहे. इथे राहून तो रिकव्हरीवर लक्ष देत आहे. त्याच्यासाठी सर्वकाही योग्य ठरत आहे. आता तो खेळण्यासाठी पूर्णपणे ठीक आहे.”
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो प्रशिक्षक रजनीकांत शिवगनानम आणि मेडिकल चीफ नितिन पटेल यांच्यासोबत दिसत आहे. त्याने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूपच मोठा प्रवास राहिला. मात्र, मी त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, ज्यांनी या प्रवासात माझी साथ दिली आणि माझी मदत केली. नितिन भाई, रजनी सर आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे स्टाफला धन्यवाद. यासोबतच बाहेरील व्यक्तींनाही धन्यवाद.”
https://www.instagram.com/p/CwSHuQCJw1W/?utm_source=ig_embed&ig_rid=b80e45ae-730e-4741-bb3f-b992c8ebfc6c
अय्यरची कारकीर्द
श्रेयस अय्यर मार्च 2023पासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत 10 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 666 धावा केल्या आहेत. तसेच, त्याने 42 वनडे सामन्यांमध्ये 1631 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 2 शतके आणि 14 अर्धशतकांचा पाऊसही पाडला आहे. अय्यरने 49 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 1043 धावांचाही पाऊस पाडला आहे. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे. (cricketer shreyas iyer scored 199 runs before asia cup 2023 ind practice match bangalore)
हेही वाचा-
नाद नाद नादच! यो-यो टेस्टमध्ये पास झाला ‘किंग’ कोहली; स्कोर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘तू भारीच’
‘भारतात त्याच्यापेक्षा चांगला बॉलर नाही…’, Asia Cupच्या संघातून चहलला बाहेर काढल्याने संतापला दिग्गज