ऑस्ट्रेलियाने क्रिकेट विश्वाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. यामध्ये डेविड वॉर्नर या विस्फोटक फलंदाजाचाही समावेश होतो. वॉर्नर 2018मध्ये एका प्रकरणात अडकला होता. ते प्रकरण चेंडूशी छेडछाडीचे होते. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर बंदी घालत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला कधीही कर्णधार बनता येणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने त्याला कर्णधार बनण्याची संधी दिली पाहिजे असे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (Glenn Mcgrath) याने वॉर्नरविषयी मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, वॉर्नरने 2018मध्ये चेंडूशी छेडछाड प्रकरणातील त्याची किंमत चुकवली आहे. आता त्याला राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनण्याची संधी दिली पाहिजे.
खरं तर, ऑस्ट्रेलिया संघातील तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत चेंडूशी छेडछाड प्रकरण भोवले होते. त्यांना या प्रकरणात अडकल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. तिघांवर एक वर्षांची बंदी घातली होती. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वॉर्नरवर कर्णधारपदासाठी कायमची बंदी घातली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नंतर म्हटले की, फलंदाजाचा पुन्हा नेतृत्व करण्याचा निर्णय घेण्याची वाट मोकळी झाली आहे. अशात मॅकग्राचे असे मत आहे की, वॉर्नर कर्णधार बनण्याची संधी मिळण्यासाठीचा दावेदार आहे.
मॅकग्राने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला वाटते, ज्याप्रकारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्थिती सांभाळली, त्यांनी वॉर्नरसाठी कोणत्याही क्रिकेट प्रकारात कर्णधार बनण्याची वाट मोकळी केली. मला असेही वाटते की, त्यांनी (वॉर्नर, स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट) किंमत चुकवली आहे.”
“त्यांनी चेंडूशी छेडछाड करण्याच्या प्रकरणात इतर कोणत्याही क्रिकेटपटूपेक्षा जास्त किंमत चुकवली आहे. जर वॉर्नरला ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी त्याला शुभेच्छा,” असेही पुढे बोलताना मॅकग्रा म्हणाला.
पुढे बोलताना मॅकग्रा म्हणाला की, “या प्रकरणाचा ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर नेहमीच परिणाम राहील. मला वाटते की, जर आम्ही पुन्हा मागे गेलो, तर जे काही झालं, त्यापासून सुटका मिळवणे सर्वात चांगली गोष्ट आहे. मात्र, हे प्रकरण ऑस्ट्रेलिया क्रिकेटवर नेहमीच एक कलंक राहील, पण मला वाटते की, सर्वांनी धडा घेतला आहे.”
डेविड वॉर्नर (David Warner) याने नुकतेच वनडेत इंग्लंडविरुद्ध खेळताना तब्बल 1043 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. तो त्याच्या जुन्या फॉर्मात परतला आहे. (former australian bowler glenn mcgrath said david warner should get chance of captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच सानिया मिर्झाची पोस्ट व्हायरल, म्हणाली, ‘मनावर दडपण…’
अय्यरने केली टीकाकारांची बोलती बंद! म्हणाला, ‘आता काय थेट टी20 मोडमध्ये…’