---Advertisement---

दु:खद! एका कसोटीत १०० धावा अन् १० विकेट्स घेणाऱ्या दिग्गज ऑसी क्रिकेटरने निधन

On: शनिवार, ऑक्टोबर 30, 2021 9:35 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ऍलन डेविडसन यांचे निधन झाले आहे. डेविडसन यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात कसोटी क्रिकेटमधून केली होती आणि एका कसोटी सामन्यात १० विकेट्स घेणारे डेविडसन हे जगातील पहिले खेळाडू आहेत. डेविडसन यांनी शनिवारी (३० ऑक्टोबर) वयाच्या ९२ व्या वर्षी त्याचा अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

डेविडसन देशांतर्गत क्रिकेटमध्ये न्यू साउथ वेल्ससाठी खेळायचे. तसेच त्यांनी ऑस्ट्रेलिया संघासाठी ४४ कसोटी सामनेही खेळले आहेत. त्यांनी या कसोटी सामन्यांमध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्यांनी या सामन्यांमध्ये १३२८ धावा केल्या आहेत. आस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांच्या क्रिकेटमधील योगदान लक्षात घेत त्यांना २०११ मध्ये हॉल ऑफ फेमने सन्मानित केले गेले होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेयरपर्सन रिचर्ड फ्रेडेन्सटाइनने या घटनेची माहिती दिली आहे. तो म्हणाले की, “ऍलन डेविडसनचे निधन ऑस्ट्रेलिया क्रिकेट आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी खूप दु:खद बादमी आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी डेविडसनची उंची खूप मोठी होती, ते फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्ससाठी खेळणारे सर्वात अप्रतिम खेळाडू नव्हते, तर एडमिस्ट्रेटर, मेंटॉर आणि सहाय्यकाच्या रूपातही त्यांचा सकारात्मक प्रभाव या खेळात पाहायला मिळाला आहे.”

“डेविडसनने त्यांच्या जबरदस्त कौशल्य आणि अमर्याद उत्कटतेने क्रिकेटला स्वीकारले आणि या खेळाविषयी जे काही महान होऊ शकते, त्याला स्वत: जगून दाखवले. ते त्या प्रत्येक खेळाडूसाठी आदर्श राहतील, ज्यांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला आवडेल.” डेविडसनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियb संघाच्या निवडकर्त्याच्या रूपात पाच वर्ष काम केले.

डेविडसनने ऑस्ट्रेलियासाठी त्यांचे कसोटीमधील पदार्पण १९५३ मध्ये ऍशेज मालिकेत केले होते. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये वेस्टइंडीज संघाविरुद्ध खेळलेल्या एका कसोटी सामन्यात १० विकेट्स आणि १०० धावा करण्याचा विक्रम केला. हा विक्रम करणारे ते पहिलेच क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी या सामन्यात एकून १२४ धावा (४४ आणि ८०) केल्या आणि गोलंदाजीमध्ये ११ विकेट्स (५/१३५ आणि ६/८७) घेतल्या होत्या. त्यांनी या सामन्यात हाताच्या बोटाला दुखापत झालेली असतानाही ८० धावांची महत्वाची खेळी केली आणि सामना ड्रॉ केला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

अफगाणिस्तानी चाहत्यांचा धुमाकूळ! तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न, आयसीसीने घेतली दखल

अफगाणिस्तानचा पराभव केल्यानंतर शोएब मलिकचा शाहिद अफ्रिदीला कडक सॅल्यूट, पाहा व्हिडिओ

क्या बात है! पाकिस्तानी फलंदाजाने करून दिली १५ वर्षे जुन्या एमएस धोनीची आठवण; कसं ते घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---